कृषी सल्ला : पावसाच्या उघडीपीचा ‘असा’ घ्या फायदा

शेतकऱ्यांची भूमिका ही रब्बी आणि खरीपासाठी महत्वाची राहणार आहे. (Agricultural Planning) शेतीमध्ये कामाचे नियोजन हा देखील महत्वाचा घटक आहे. अनियमित कामे झाली तर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे खरीप हंगामात अनुभवले आहे. त्यामुळे खरीपातील पिकाची मळणी आणि भविष्यातील रब्बीचे नियोजन कसे असावे याबाबत कृषितज्ञ संतोष घसिंग यांनी टीव्ही 9 मराठी ला दिलेली माहिती..

कृषी सल्ला : पावसाच्या उघडीपीचा 'असा' घ्या फायदा
संग्रहीत छायाचित्र

लातूर : मराठवाड्यातील (Marathwada) हिंगोली, जानला वगळता परतीच्या पावसाचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झालेला नाही. त्यामुळे शेती कामे ही सुरुच आहेत. हवामान विभागाने 16 ते 20 ऑक्टोंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, पावसामध्ये सातत्य राहिले नाही शिवाय मुसळधार (Heavy Rain) पाऊसही झाला नाही. त्यामुळे होणारे नुकसान हे टळलेले आहे. आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे तर रब्बीची सुरवात होत आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांची भूमिका ही रब्बी आणि खरीपासाठी महत्वाची राहणार आहे. (Agricultural Planning) शेतीमध्ये कामाचे नियोजन हा देखील महत्वाचा घटक आहे. अनियमित कामे झाली तर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे खरीप हंगामात अनुभवले आहे. त्यामुळे खरीपातील पिकाची मळणी आणि भविष्यातील रब्बीचे नियोजन कसे असावे याबाबत कृषितज्ञ संतोष घसिंग यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ ला दिलेली माहिती…

खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळालेले नाही. आता खरीपातील केवळ सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिकेच अजूनही वावरात आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिली असल्याने या पीकाची मळणी करुन जमिनक्षेत्र हे रब्बी हंगामासाठी तयार करणे महत्वाचे झाले आहे. कारण रब्बीच्या पेरणीला महिन्याचा उशीर झाला आहे तर सोयाबीनही अधिकचा काळ राहिले तर त्यालाही बुरशी लागण्याचा धोका आहे. त्यामुळे त्याची मळणी ही महत्वाची आहे.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्रात

पावसाने पीकाची नासाडी झाली आहे. ज्या भागात अधिकचा पाऊस झाला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उर्वरीत पिकाचा विचार न करता रब्बीसाठी क्षेत्र कसे रिकामे करता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. या क्षेत्रावर रब्बी हंगामाची पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. सर्रास सोयाबीनच्या क्षेत्रावर हरभरा या पीकाचे उत्पादन घेतले जाते त्यानुसार सोयाबीनची काढणी करुन हलक्या स्वरुपाची मशागत करणे आवश्यक आहे.

कापूस धोक्याचाच

कपाशीच्या उत्पादनाची आशा ही शेतकऱ्यांनी ही राहिलेली असते. मात्र, शेंद्रीय बोंडआळीचा उगमच कापसाच्या बोंडातून होतो. असे असतानाही शेतकरी कापूस हा वावरातच ठेवतो. पण जेवढे उत्पादन पदरी पडले आहे त्यावरच समाधान मानून शेतकऱ्यांनी रब्बीच्या तयारीला लागणे महत्वाचे आहे. कारण कापूस शेतात ठेवला तर पुन्हा बोंडआळीला निमंत्रण दिल्यासारखे होणार आहे. त्यामुळे कापसाच्या वेचणी झाली असेल तर हे पीक शेताबाहेर काढणेच फायद्याचे राहणार अन्यथा आगामी पिकावरही बोंडआळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कपाशीची मोडणी करुन दुसऱ्या पिकाची तयारी करावी.

सोयाबीनच्या उतारातही घट

दरवर्षी सोयाबीनचे एकरी 9 ते 10 क्विंटलचा उतार असतो. यंदा मात्र यामध्ये निम्म्याने घट झालेली आहे. सोयाबीनचा कालावधी हा संपलेला आहे. त्यामुळे काढणी- मळणी करुन सोयाबीन हे ऊनामध्ये वाळवावे लागणार आहे. पावसामुळे त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे अधिक आहे. त्यामुळे योग्य दरही मिळत नाही. शिवाय पावसाच्या पाण्यामुळे सोयाबीन हे काळवंडलेले आहे. त्यामुळे वाळवण झाले की त्याची विक्री केली तर भविष्यातील नुकसान हे टळणार आहे. त्यामुळे काम अधिकचे आणि वेळ कमी यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाचा समारोप करुन रब्बीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

यंत्राच्या सहाय्याने करा मशागत अन् पेरणी

रब्बी हंगामात हलक्या स्वरुपाची मशागत महत्वाची असते. त्यामुळे रोटरुन पेरणी केली तर पीकाची उगवण ही होणार आहे. मात्र, बैलजोडीने मशागतीची कामे केली अधिकचा वेळ खर्ची होणार आहे. आगोदरच रब्बीच्या पेरणीला महिन्याभराचा उशीर झालेला आहे. त्यामुळे योग्य नियोजनानेच रब्बीची पेरणी करण्याचे अव्हान आता शेतकऱ्यांसमोर आहे. (Kharif season in final stages, now plan rabbi properly, advises agronomist)

संबंधित बातम्या :

‘टॅगिंग’च्या उपक्रमात राज्यातील 53 साखर कारखाने, थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल

हरभऱ्याला पोषक वातावरण, अनुदानही मिळणार प्रतिक्विंटल अडीच हजाराचे, असा घ्या लाभ

बोंबला…! विमा अर्जांचे गठ्ठे थेट ऊसाच्या फडात, मदत मिळणार तरी कशी ?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI