Pune : 37 टक्के पाऊस अन् 8 पेरण्या, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप धोक्यात

खरीप हंगाम हा पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्यावर पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होते. अन्यथा नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरीएवढा पाऊस झाल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवावी असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने कऱण्यात आले आहे. असे असले तरी पुणे जिल्ह्यात केवळ 65.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Pune : 37 टक्के पाऊस अन् 8 पेरण्या, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप धोक्यात
पावसाअभावी राज्यातील पेरण्या रखडल्या आहेत. पुणे जिल्ह्यात 8 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
सुनिल थिगळे, प्रतिनिधी

| Edited By: राजेंद्र खराडे

Jun 28, 2022 | 9:36 AM

पुणे : देशात (Monsoon) मान्सून दाखल होऊन महिन्याचा कालावधील लोटला आहे असे असताना सबंध राज्यभर पाऊस सक्रीय झालेला नाही. पावसाच्या अनियमिततेमुळे पेरण्यांमध्येही सातत्य राहिलेले नाही. जून महिन्यात (Pune District) पुणे जिल्ह्यात सरासरी 176 मिमी पाऊस बरसतो. यंदा मात्र केवळ 37 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्रापैकी केवळ 8 टक्के क्षेत्रावर (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचा पेरा झाला आहे. असे असताना अजूनही पाऊस सक्रीय झाला नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या होतील की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. उत्पादन आणि उत्पन्न या दृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा असताना यंदा यावर चिंतेचे ढग कायम आहेत. आता पेरण्या झाल्या तरी उत्पादनात घट होणार हे निश्चित आहे.

अपेक्षित पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा

खरीप हंगाम हा पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्यावर पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होते. अन्यथा नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरीएवढा पाऊस झाल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवावी असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने कऱण्यात आले आहे. असे असले तरी पुणे जिल्ह्यात केवळ 65.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, धोका पत्करुन शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पेरणी केलेल्या क्षेत्रावरील पिकेही धोक्यात आल्याने आता दुबार पेरणीचे संकट ओढावणार ने निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे खर्चून जमिनीत बियाणे गाढण्यापेक्षा पावसाची वाट पाहणे हेच महत्वाचे असल्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा भर सोयाबीनवर

खरीप हंगामातील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे आता कडधान्याच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कडधान्याचा पेरा हा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणे गरजेचे असते पण आता जून महिना अंतिम टप्प्यात असतानाही पेरण्या न झाल्याने भविष्यात सोयाबीन आणि कापसावरच शेतकऱ्यांचा भर राहणार आहे. शेतकऱ्यांना अल्पावधित येणाऱ्या वाणाचा वापर करावा लागणार आहे. पेरण्यांना उशीर झाला असला तरी आता योग्य नियोजन केले तरच उत्पादनात वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मशागतीची कामे पूर्ण, पावसाची प्रतिक्षा

उत्पादनात वाढ व्हावी म्हणून हंगामाच्या सुरवातीलाच शेती मशागतीचे कामे पूर्ण केली जातात. यंदाही शेतकऱ्यांनी नांगरण, मोगडण आणि कुळपणीची कामे पूर्ण झाली आहेत. पेरणीच्या अनुशंगाने सर्वतोपरी तयारी झाली असली तरी शेतकऱ्यांना मात्र, पावसाची प्रतिक्षा कायम आहे. खरीप हंगामातील पेरण्या ह्या 15 जुलैपर्यंत करता येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें