Kharif Season : व्हायचे तेच झाले, गतवर्षीच्या तुलनेत खरिपाचे पेरणी क्षेत्र घटले, कृषी विभागाकडून अहवाल सादर

महाराष्ट्रात 1 कोटी 4 लाख हेक्टरापैकी केवळ 10 लाख हेक्टरावर पेरा झाला आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात 0.82 लाख हेक्टराऐवजी 0.73 लाख हेक्टरावर पेरणी झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र सरासरी प्रमाणे पेरा झाला आहे. तर पंजाब,हरियाणा आणि राजस्थानातही पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी घटलेली आहे. केवळ गुजरातमध्ये परस्थितीमध्ये वेगळी आहे.

Kharif Season : व्हायचे तेच झाले, गतवर्षीच्या तुलनेत खरिपाचे पेरणी क्षेत्र घटले, कृषी विभागाकडून अहवाल सादर
खरीप हंगमात धान पिकाच्या पेरणीत यंदा घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 6:06 PM

मुंबई : नाही म्हणलं तरी (Monsoon Effect) पावसाच्या लहरीपणाचा परिणाम (Kharif Season) खरीप हंगामावर झालाच. गतवर्षीच्या तुलनेत देशात तब्बल 22 टक्के पेरणीत घट झाली आहे. मान्सून दरवर्षीपेक्षा तीन दिवस आगोदर देशात दाखल झाला खरा पण तो सक्रीयच झाला नसल्याने खरिपातील पेरण्या रखडल्या आहेत. कृषी विभागाने खरिपातील पेरणीची आकडेवारी जाहीर केली असून यामध्ये ही बाब समोर आली आहे. (Irregularity of rain) पावसाच्या अनियमिततेमुळे हा स्थिती ओढावल्याचे कृषितज्ञांनी सांगितले आहे. तर नैऋत्य मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी द्वीपकल्पीय आणि मध्य भारतात 12 जूनपर्यंत सरासरीपेक्षा 41 आणि 69 टक्के कमी पाऊस कमी झाल्याचे अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक संतोष के. बाल यांनी सांगितले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरले जाणाऱ्या कडधान्यात 40 ते 45 टक्के घट झाली आहे.

अशी आहे खरिपातील पीक पेरणीची स्थिती

यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या धान पिकावरच मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ 65 हजार हेक्टरावर धान पिकाचा पेरा झाला आहे तर यंदा हेच प्रमाण 64 हजारावर आहे. गतवर्षी आतापर्यंत कडधान्याचा पेरा हा 0.27 लाख हेक्टरावर झाला होता तर आता 0.20 लाख हेक्टरावर पेरा झाला आहे. मका पिकामध्येही लक्षणीय घट झाली आहे. गतवर्षी 0.34 लाख हेक्टरावर लागवड झाली होती तर यंदा केवळ 0.25 लाख हेक्टर क्षेत्र मक्याने व्यापले आहे. तर तेलबियाय गतवर्षी 0.19 लाख हेक्टरावर यंदा 0.13 लाख हेक्टरावर आहेत. खरीपातील प्रत्येक पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे.

गुजरातमध्ये मात्र परस्थिती वेगळी

महाराष्ट्रात 1 कोटी 4 लाख हेक्टरापैकी केवळ 10 लाख हेक्टरावर पेरा झाला आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात 0.82 लाख हेक्टराऐवजी 0.73 लाख हेक्टरावर पेरणी झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र सरासरी प्रमाणे पेरा झाला आहे. तर पंजाब,हरियाणा आणि राजस्थानातही पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी घटलेली आहे. केवळ गुजरातमध्ये परस्थितीमध्ये वेगळी आहे. पावसाने समाधनकारक हजेरी लावल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सरासरीप्रमाणे खरिपाचा पेरा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

ऊसाच्या क्षेत्रात मात्र वाढ

पावसाच्या लहरीपणाचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झाला असला तरी उसाच्या लागवडीमध्ये मात्र, शेतकऱ्यांनी हायगई केली नाही. गेल्यावर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तब्बल 4 लाख 63 हजार हेक्टरावर लागवड ही पूर्ण झाली होती. तर यंदा प्रतिकूल परस्थितीमध्येही 4 लाख 71 हजार हेक्टरावर लागवड करण्यात आली आहे. सर्वाधिक क्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशात गतवर्षी 2 लाख 35 हजार हेक्टरावर लागवड झाली होती तर यंदा 2 लाख 27 हजार हेक्टरावर ऊस आहे. सरासरीप्रमाणे ऊसाची लागवडीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांनी ठेवले आहे.

Non Stop LIVE Update
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.