AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुतीची लागवड अन् रेशीमचे उत्पादन, उद्योग सुरु करण्यासाठी जाणून घ्या महत्वाची माहिती..

पारंपारिक शेतीतून उत्पादन कमी आणि अचानक पिक पध्दतीमध्ये केलेल्या बदलामुळे होणारे नुकसान या दोन्ही बाबींची अनुभती सध्या शेतकऱ्यांना येत आहे. पण या प्रतिकूल परस्थितीमध्येही एक पर्याय समोर येत आहे तो रेशीम उद्योगाचा. यंदाच्या वर्षात कोषाचे दरही वाढलेले आहेत. या कोषाचे प्रतिकिलोचे दर हे 650 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे कमी पाण्यात अधिकचे उत्पादन यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम उद्योगाकडे वळत आहेत.

तुतीची लागवड अन् रेशीमचे उत्पादन, उद्योग सुरु करण्यासाठी जाणून घ्या महत्वाची माहिती..
शेती पध्दतीमध्ये बदल होऊन आता शेतकऱ्यांचा कल तुती लागवडीकडे आहे. राज्यात तुती लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 12:53 PM
Share

पुणे : पारंपारिक शेतीतून उत्पादन कमी आणि अचानक पिक पध्दतीमध्ये केलेल्या बदलामुळे होणारे नुकसान या दोन्ही बाबींची अनुभती सध्या शेतकऱ्यांना येत आहे. पण या प्रतिकूल परस्थितीमध्येही (good alternative to farmers) एक पर्याय समोर येत आहे तो (Silk fund industry) रेशीम उद्योगाचा. यंदाच्या वर्षात कोषाचे दरही वाढलेले आहेत. या कोषाचे प्रतिकिलोचे दर हे 650 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे कमी पाण्यात अधिकचे उत्पादन यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. त्याअनुशंगानेच राज्यात पार पडलेल्या महारेशीम अभियानात या उद्योगाचे महत्व पटवून देण्यात आले होते. तर चालू वर्षात 3 हजार 519 शेतकऱ्यांनी 3 हजार 562 एकरावर तुतीची लागवड केली आहे.

यामुळे वाढत आहे रेशीम उद्योगाचे महत्व

गेल्या काही दिवसांपासून रेशीम कोषाचे दर वाढत आहेत. कमी पाण्यात अधिकचे उत्पन्न आणि तरुण शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या बाबतीत असलेला कल यामुळे तुती लागवडीत वाढ होत आहे. सध्या रेशीम कोषाचे दर हे 650 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. शिवाय अजूनही या अनोख्या व्यावसयाला सुरवात करण्याची चांगली संधी ही शेतकऱ्यांकडे आहे. कारण आता रेशीम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

महाअभियनात झाली जनजागृती

रेशीम उद्योगाचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात यावे म्हणून गतमहिन्यात विकास मंडळाकडून महारेशीम अभियान संबंध राज्यात राबविण्यात आले होते. या दरम्यान, तुती लागवडीचे महत्व आणि रेशीम उद्योगातून होणारी आर्थिक प्रगती याचे माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली होती. अभियानात 5 हजार एकरावर तुती लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात 10 हजार 500 शेतकऱ्यांनी या अभियनात सहभाग घेतला तर 10 हजार 511 एकरावर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. राज्यात आतापर्यंत 16 हजार 263 एकरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. शिवाय डिसेंबर, जानेवारीमध्येही यामध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अनुदानासाठी असा करा अर्ज

सर्व प्रथम रेशीम संचालनालयाची www.mahasilk.maharashtra.gov.in या वेबसाईट वर साईन अप मध्ये New user वर क्लिक करून I Agree केल्यानंतर Stake Holder मध्ये – Farmer – Mulberry/Tasar वर क्लीक करावे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड व बँक पास बुक ची फोटो कॉपी Upload करावी. शेवटी Submit केल्यानंतर शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्याचे कॉम्पुटर च्या screen वर sms येईल. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास जाऊन 7/12, 8 अ, बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड हे नोंदणी शुल्कासह देऊन नोंदणी पूर्ण करावी.

अनुदान किती आहे?

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजने अंतर्गत 1 एकरसाठी तुती लागवड जोपासना तसेच साहित्य खरेदी यामध्ये रोपे, खते, औषधी यासाठी एकूण 2 लाख 176 रुपये इतके अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाते. तसेच किटक संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात 92 हजार 289 रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेत लाभ घेण्यासाठी मात्र, लाभार्थी यांचेकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. तर केंद्रच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या सिल्क समग्र ही योजना ज्यांच्यासाठीच आहे जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सहभाग घेऊ शकले नाहीत. सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी जॅाबकार्ड असेल तर एकूण खर्चाच्या 75 टक्के अनुदान हे तीन वर्षात मिळते. तर अनुसूचित जाती-जमातीमधील लाभार्थ्यांसाठी 90 टक्के अनुदान 3 वर्षात मिळते. किमान 1 एक्करमध्ये तुतीची लागवड ही बंधनकारक राहणार आहे.

अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, 8 अ, राष्ट्रीयकृत बॅंकेच्या पासबुकची झेरॅाक्स, आधार कार्डची झेरॅाक्स, मतदान ओळखपत्र, मनरेगाच्या जॅाबकार्डची झेरॅाक्स आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो हे रेशीम उद्योग कार्यालयात जमा करावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

अगोदर लसीकरणाचे प्रमाणपत्र, मगच शेतीमाल बाजारात, कोणत्या बाजार समितीने काढले ‘फर्मान’?

कष्ट करून शेतकरी बेजार, दलाल मात्र मालामाल..! नागपूरच्या भाजीबाजारातले भयाण वास्तव

अवकाळी पावसाचा केवळ तुरीला आधार, फळबागांसह इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.