अवकाळी पावसाचा केवळ तुरीला आधार, फळबागांसह इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसानच झाले आहे. मात्र, खरीप हंगामातील अंतिम टप्प्यात असलेल्या तूर पिकाला या पावसामुळे आधार मिळालेला आहे. सध्या जिल्ह्यात तूर पीक हे अंतिम टप्प्यात आहे. अशा अवस्थेत झालेल्या पावसामुळे शेंगा पोसण्यास मदत होणार आहे. परिणामी उत्पादनात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

अवकाळी पावसाचा केवळ तुरीला आधार, फळबागांसह इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव
संग्रहीत छायाचित्र

वाशिम : अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसानच झाले आहे. मात्र, खरीप हंगामातील अंतिम टप्प्यात असलेल्या (Toor Crop) तूर पिकाला या पावसामुळे आधार मिळालेला आहे. सध्या (Washim) जिल्ह्यात तूर पीक हे अंतिम टप्प्यात आहे. अशा अवस्थेत झालेल्या पावसामुळे शेंगा पोसण्यास मदत होणार आहे. परिणामी उत्पादनात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे कहीं खुशी…कही गम अशीच अवस्था अवकाळी पावसाने केली आहे. जिल्ह्यात (Damage to Orchards) फळबागांचे क्षेत्र हे मर्यादित आहे. पण खरिपाचे क्षेत्र अधिकेच असल्याने दोन दिवस झालेल्या पावसामुळे तूर पिकाला मोठा आधार मिळाला आहे. पण इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे.

तूर पिक ‘सेफझोन’मध्येच

ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. पण अतिवृष्टीमुळे हे पीक भुईसपाट झाले होते. तर उडीद, मूगाचेही नुकसान झाले होते. त्याचा परिणाम आता उत्पादनावर झालेला आहे. सोयाबीनेच उत्पादन घटल्यामुळेच आता मागणी वाढत आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी आणि आताचा अवकाळी हा तुरीसाठी पोषकच ठरत आहे. कारण सध्या जिल्ह्यात तूर पिकाच्या शेंगा पोसण्याच्या अवस्थेत आहेत. अशातच सलग दोन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने चांगल्या प्रकारे शेंगा पोसतील व उत्पादनात वाढ होईल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

फळबागांसह रब्बी पिकांचे मात्र, नुकसानच

अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे ते आंबा आणि द्राक्ष बागांचे. किड अन् बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट आहेच पण आता आंब्याचा हंगामही लांबणीवरच पडणार आहे. तर द्राक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र हे प्रमाणात असल्याने नुकसानीच्या झळा मोठ्या प्रमाणात बसलेल्या नाहीत उलट तूर पिकासाठी या पावसाचा मोठा आधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

तुरीची आवक सुरु झाल्यास काय राहणार चित्र

खरीप हंगामातील तूर हे अंतिम पिक आहे. सध्या तुरीच्या शेंगा ह्या पोसलेल्या असून सोलापूर जिल्ह्यात तुरीची काढणी कामे ही सुरु झाली आहेत. पण सध्याचा पाऊस तुरीसाठी काही प्रमाणात पोषक असला तरी बाजारपेठत मात्र, तुरीला प्रतिकूल वातावरण आहे. कारण केंद्र सरकारने तुरीची आणि हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आयात केली आहे. त्यामुळे बाजारात नव्या तुरीची आवक वाढली तर मात्र, दरात घट ही ठरलेलीच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लागलीच खरेदी केंद्र सुरु करण्याची गरज आहे. अन्यथा हमी भावापेक्षा कमी दराने तूर विक्रीची नामुष्की ओढावणार आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीन उत्पादकांना ‘अच्छे दिन’, सोयापेंड आयातीच्या चर्चेला पूर्णविराम

मराठवाड्यात ‘या’ नव्या पिकाचे क्षेत्र तर वाढले आता उत्पादन वाढीसाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!

Record Break : बीज गुणन केंद्राची किमया : 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI