सोयाबीन उत्पादकांना ‘अच्छे दिन’, सोयापेंड आयातीच्या चर्चेला पूर्णविराम

सोयापेंड आयातीची मर्यादा मार्च 2022 पर्यंत केली तर पुन्हा सोयाबीनचे दर घसरतील असे चित्र बाजारपेठेत निर्माण झाले होते. पण आता या सर्व चर्चांना खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीच पूर्णविराम दिलेला आहे. सोयापेंडच्या आयातीबाबत केंद्राचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना हा मोठा दिलासा असून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम आता बाजारपेठेवरही पाहवयास मिळेल.

सोयाबीन उत्पादकांना 'अच्छे दिन', सोयापेंड आयातीच्या चर्चेला पूर्णविराम
सोयापेंडची आयात करु नये या मागणीचे निवेदन शेतकरी नेते पाशा पटेल यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दिले आहे.
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 10:17 AM

लातूर : सोयाबीन (Soybean Prices) दराला घेऊन गेल्या 15 दिवसांपासून वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरु होती. ( Import of Soypend) सोयापेंड आयातीची मर्यादा मार्च 2022 पर्यंत केली तर पुन्हा सोयाबीनचे दर घसरतील असे चित्र बाजारपेठेत निर्माण झाले होते. पण आता या सर्व चर्चांना खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीच पूर्णविराम दिलेला आहे. सोयापेंडच्या आयातीबाबत (Central Government) केंद्राचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना हा मोठा दिलासा असून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम आता बाजारपेठेवरही पाहवयास मिळेल. मात्र, सोयापेंडच्या आयातीला खा. डॅा. अमोल कोल्हे, शेतकरी नेते पाशा पटेल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला होता.

सोयापेंड आयातबद्दल काय म्हणाले केंद्रीय मंत्री पियुष गोयल?

सोयापेंड आयातीच्या मागणीला महाराष्ट्रातील शेतकरी संघटना तसेच राजकीय नेत्यांनीही विरोध केला होता. अखेर शेतकरी नेते पाशा पटेल यांनी तर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोयापेंड आयात केली तर शेतकऱ्यांचे कसे नुकसान होणार आहे हे पटवून दिले होते. त्याच दरम्यान, पियुष गोयल यांनी सोयापेंड आयातसंदर्भात कोणताही विचार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी यासंदर्भात ट्विटही केले आहे. त्यामुळे आता सोयापेंडची आयात होणार नाही हे स्पष्ट झाले असल्याने त्याचे बाजारपेठेत काय परिणाम होतात हे पहावे लागणार आहे.

पोल्ट्री व्यावसायिकांकडून वाढला दबाव

मागणी अधिक आणि पुरवठा कमी यामुळे सोयाबीनच्या दरात दिवाळीनंतर वाढ झाली आहे. मात्र, यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना अधिकच्या दरात कोंबड्यांना खाद्य घ्यावे लागत असल्याने सोयापेंडची आयात करुन सोयाबीनचे दर नियंत्रणात ठेवण्याची मागणी केली जात होती. ऑगस्ट महिन्यातच 12 लाख टन सोयापेंडची आयात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार 6 लाख 50 हजार टन आयातही झाली मात्र, उर्वरीत सोयापेंडही आयात करण्याची मागणी जोर धरु लागली होती. मात्र, आता या चर्चेला वाणिज्य पियुष गोयल यांनीच पूर्णविराम दिला आहे.

सोयाबीनच्या दरात कशी झाली सुधारणा

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचे दर हे घसरलेले होते. मात्र, उत्पादनात घट आणि पावसामुळे झालेले नुकसान पाहता सोयाबीनच्या दरात वाढ होईल असा विश्वास शेतकऱ्यांना होताच. त्यामुळे सोयाबीनची विक्री न करता त्यांनी साठवणूकीवरच भर दिला अखेर 4 हजार 500 रुपयांवर असलेले सोयाबीन दिवाळीनंतर 6 हजार 800 रुपयांवर गेले होते. शिवाय साठा मर्यादा हटविल्यामुळे प्रक्रिया उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला आहे. मात्र, वाढीव दराला पोल्ट्री व्यावसायिकांचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यामुळे पुन्हा सोयापेंडची आयात करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. मात्र, सध्या तरी केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यात ‘या’ नव्या पिकाचे क्षेत्र तर वाढले आता उत्पादन वाढीसाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!

Record Break : बीज गुणन केंद्राची किमया : 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही परिवर्तन केले पण निसर्गालाही नाही बघवले

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.