कष्ट करून शेतकरी बेजार, दलाल मात्र मालामाल..! नागपूरच्या भाजीबाजारातले भयाण वास्तव

नागपूरच्या गोकुळपेठ येथील किरकोळ बाजारात. ठोक बाजारात शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलो घेतलेला पालक किरकोळ बाजारात चक्क 60 रुपये किलो याप्रमाणे ग्राहकांना विकला जात आहे. त्यामुळे ना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा आहे ना ग्राहकांना मात्र, मध्यस्तीची भूमिका निभावणारे विक्रते ग्राहकांची लूट आणि शेतकऱ्यांची फसवणूक कशी करतात याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

कष्ट करून शेतकरी बेजार, दलाल मात्र मालामाल..! नागपूरच्या भाजीबाजारातले भयाण वास्तव
संग्रहीत छायाचित्र

नागपूर : शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधला दुवा असलेला दलाल हा जेवढे शेतकरी काबाड कष्ट करुन कमाई करु शकत नाही त्याच्या कित्येक पटीने हे मध्यस्ती असलेले दलाल कमावतात. याचे वास्तव समोर आलंय ते (Nagpur) नागपूरच्या गोकुळपेठ येथील किरकोळ (Vegetable market) भाजीपाला बाजारात. ठोक (market) बाजारात शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलो घेतलेला पालक किरकोळ बाजारात चक्क 60 रुपये किलो याप्रमाणे ग्राहकांना विकला जात आहे. त्यामुळे ना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा आहे ना ग्राहकांना मात्र, मध्यस्तीची भूमिका निभावणारे विक्रते ग्राहकांची लूट आणि शेतकऱ्यांची फसवणूक कशी करतात याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

5 रुपये किलोचा पालक दोनच तासांमध्ये 60 रुपयांवर

बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाल्याचे भासवत शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी ही ठोक बाजारात केली जाते. नागपूर येथील ठोक बाजारात दररोज सकाळी हजारो शेतकरी हे भाजीपाला घेऊन येतात. मात्र, व्यापारी आणि किरकोळ विक्रत्ये हे संगणमत करुनच कमी भवात खरेदी आणि त्याच्या दहापटीने विक्री करीत असल्याचे चित्र आहे. कारण ठोक बाजारात 5 रुपये किलोने घतलेला पालक हेच मध्यस्ती गोकुळ बाजारपेठेत ग्राहकांना 60 रुपये किलोप्रमाणे विक्री करतात. यावर कुणाचाच अंकूश नसल्याने ही दरातील तफावत वाढत आहे.

शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही परवडेना

ऐन हिवाळ्यात भाजीपाल्याची मोठी आवक असते. मात्र, मध्यंतरीच्या पावसाचा फटका बसला असल्याचे भासवत किरकोळ बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. ठोक बाजारात शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने भाजीपाल्याची खरेदी करायची आणि किरकोळ बाजारात मनमानी दर लावून त्याची विक्री करायची. मध्यस्ती असलेल्या विक्रेत्यांवर तसे बाजार समितीचे अंकूश असते पण सध्या व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्ये यांचाच हस्तक्षेप हा वाढलेला आहे. एकीककडे शेतऱ्यांकडून घेतलेल्या भाजीपाल्याची विक्री ही दहापट अधिकच्या दराने केली जात आहे तर दुसरीकडे मात्र, शेतकऱ्यांना वाहतूकीचाही खर्च परवडत नसल्याचे भिषण वास्तव आहे.

ग्राहकांचेही मोठे नुकसान

शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधला दुवा म्हणून या विक्रेत्यांकडे पाहिले जाते. मात्र, मध्यस्तीच्या भूमिकेनुसार अधिकचे दर ठिक आहे पण दहा पटीने अधिकचे पैसे ग्राहकांकडून घेतले जात आहे. ही एक प्रकारची लूट असून यावर बाजार समितीचा अंकूश राहणे गरजेचे आहे. अन्यथा जगाचा पोषिंदा मानला जाणार बळीराजा कायम कष्टातच राहिल. बाजारपेठे भाजीपाल्याची आवक ही कमी असल्याचे सांगत हे विक्रेत्ये मनमानी दर आकारुन ग्राहकांची एक प्रकारची लूटच करीत आहेत.

संबंधित बातम्या :

अवकाळी पावसाचा केवळ तुरीला आधार, फळबागांसह इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

सोयाबीन उत्पादकांना ‘अच्छे दिन’, सोयापेंड आयातीच्या चर्चेला पूर्णविराम

मराठवाड्यात ‘या’ नव्या पिकाचे क्षेत्र तर वाढले आता उत्पादन वाढीसाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI