राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करा, कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याच्या सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी कृषी विभागाला दिल्या.

राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करा, कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
दादाजी भुसे
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 6:17 PM

मुंबई: राज्यात बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे बियाणे धोरण तत्काळ तयार करण्याच्या सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी कृषी विभागाला दिल्या. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बियाणे धोरणाबाबत राज्यस्तरीय बैठक मंत्रालयात झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नायक, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख हे उपस्थित होते. (Maharashtra Agriculture Minister Dadaji Bhuse order to make Seed Policy of State)

पश्चिम महाराष्ट्रात बिजोत्पादन कार्यक्रमाचं आयोजन करा

पश्चिम महाराष्ट्रात सोयाबिन पिकाची उत्पादकता जास्त असून महाबीजने येत्या खरीप हंगामात विदर्भ व मराठवाडा याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात देखील बिजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन करावे. त्याकरिता राज्यातील तज्ञ व्यक्ती, कृषी विभाग, कृषी विद्यापिठे व महाबीज यांनी समन्वयाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करावी. जेणेकरून राज्यात भेसळमुक्त व गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती होईल याबाबत आतापासून नियोजन केले तर येणाऱ्या वर्षभरात सकारात्मक बदल दिसून येईल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

बिजोत्पादनामध्ये गतवैभव मिळवायचंय

कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, महाराष्ट्र हे बिजोत्पादनासाठी राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर म्हणून गणले जात होते. तथापी अलीकडच्या काळात पिक पेरणीनुसार विशेषत: सोयाबिन, कापूस यासारख्या पिकांचे बियाणे परराज्यातून आणावे लागत आहे. राज्यातील बियाणे उद्योगास गतवैभव प्राप्त करून देणेसाठी व बियाणे उद्योगाकरिता आश्वासक वातावरण निर्मिती करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बियाणे उद्योगात आघाडी मिळवण्यासाठी राज्याची प्रत्येक पिकातील बियाणे गरज नजरेसमोर ठेवून बियाणे साखळी विकसीत करावी. यामध्ये पैदासकार व मुलभुत बिजोत्पादनाचे काटेकोर नियोजन करावे. ज्या कृषी विद्यापिठाने पीक निहाय वाण विकसीत केला आहे ते बियाणे कृषी विद्यापीठाने मागणी प्रमाणे उपलब्ध होण्यासाठी नियाजन करावे. याबाबत सर्वस्वी जबाबदारी त्या संबधीत कृषी विद्यापिठाची राहील, असे कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पैदासकार बियाणे हा बिजोत्पादन कार्यक्रमाचा पाया

पैदासकार बियाणे हा बिजोत्पादन कार्यक्रमाचा पाया असल्याने त्यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे. कृषी विद्यापिठाचे प्रक्षेत्र हे पैदासकार बियाणाच्या उत्पादनासाठी प्राधान्याने वापरावे.कृषि विभागाकडील तालुका बीजगुणन केंद्र, फळ रोपवाटीका यांचा देखील महाबीजने पुढाकार घेऊन बिजोत्पादनासाठी वापर करण्याच्या सुचना दादा भुसे यांनी यावेळी दिल्या. राज्यात सीड हब उभारणीसाठी येणाऱ्या अडचणी, जागेची उपलब्धता, बिजपरिक्षण प्रयोगशाळा उभारणी, सामुहीक प्रक्रिया व सिड पॅकींग केंद्र याबाबतचा कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला.

संबंधित बातम्या:

रासायनिक खते आणि बियाण्यांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका, कृषी सेवा केंद्र ओस पडली

शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ व खासगी उत्पादकांनी बनवलेली आधुनिक अवजारं मिळणार: दादाजी भुसे

(Maharashtra Agriculture Minister Dadaji Bhuse order to make Seed Policy of State)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.