गारपीटीमुळे शेकडो चिमण्यांचा मृत्यू, अनेक घरांची पडझड
यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे,गारपीटीमुळे शेकडो चिमण्यांचा मृत्यू, अनेक घरांची पडझड, हजारो झाडे पडली आहेत.

महाराष्ट्र : यवतमाळ (yawatmal) जिल्ह्यात बुधवारी रात्री दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस (unseasonal rain) झाला. वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील अनेक गावातील पेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर शंभर पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. विदर्भाच्या (vidharbh) शेवटच्या टोकावरील आणि यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील साकुर, कोसदनी, मुकिंदपुर इथे निसर्गाचा कोप पहायला मिळाला. अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगाळी वातावरण निर्माण होऊन सुसाट वेगाने वारा वाहू लागला. त्यामध्ये विजांचा कडकडाट, सुसाट वारा यामुळे गावातील घरावरील टिनाची छपरे उडून गेली. मोठ-मोठी झाडे जमीनदोस्त झाली. विद्युत पोल जमिनीवर कोसळल्यामुळे सगळीकडे अंधार पसरला आणि गारांचा पाऊस सुरु होता.
कांदा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी येवल्यातील कांदा उत्पादकांचे लगबग….
गेल्या महिन्यापासून राज्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेलं असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचा विदर्भ, मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात वातावरणात बदल होत असल्याने आकाशात ढगांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी कांदा उत्पादकाची धावपळ पाहायला मिळत आहे. कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतातून काढलेल्या कांद्याची प्रतवारी करत चाळीमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी कांदा उत्पादकांची लगबग सुरु आहे. यावेळी कांद्याला बाजार भाव मिळत नाही, ५० ते ६० हजार रुपये खर्च झाला आहे. ३० ते ४० हजार निघणे मुश्कील झाले आहे. यामुळे लाल कांद्याप्रमाणे उन्हाळी कांद्याला ही अनुदान दिले पाहिजे अशी येवल्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
बुलढाणा जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय घरावरील छप्पर उडून गेल्याने अनेकांच्या घरातील अन्नधान्य भिजले आहे. अक्षरशः घरातील लोकांना रात्र जागून काढावी लागली. घरावर झाडे पडल्याने घरांचे ही मोठ नुकसान झालं. मोताळा तालुक्यातील मूर्ती गावातील 20 ते 28 नागरिकांच्या घरावरील छप्पर उडून गेलीय.
