AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीक विमा योजनेची मोठी अपडेट, मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबांना दिलासा, झटपट पूर्ण होणार दावा प्रक्रिया

PM Pik Vima Yojana: सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेचे नियम अत्यंत सुटसुटीत झाले आहेत. त्यामुळे मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. आता पेंडिंग क्लेमची प्रक्रिया गतीने होईल. काय होईल शेतकऱ्यांना फायदा?

पीक विमा योजनेची मोठी अपडेट, मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबांना दिलासा, झटपट पूर्ण होणार दावा प्रक्रिया
पंतप्रधान शेतकरी विमा योजनाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 11, 2026 | 8:36 AM
Share

PM Pik Vima Yojana: पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक केली आहे. शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळवण्यासाठी सरकारी कार्यालय आणि बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. कागदी घोडे नाचवावे लागतात. तरीही शेतकऱ्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम लवकर मिळत नाही. याविषयी मोठी ओरड होती. मान्सून सक्रिय होण्यापूर्वी आता याविषयीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली आहे.

नियमात मोठा बदल

आता यातील अडथळा सरकारने दूर केला आहे. नियमात मोठा बदल केला आहे. सरकारी बाबू या प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहेत. पीडित कुटुंबाला कोणताही मानसिक त्रास होऊ नये आणि विमा योजनेची रक्कम मिळावी यासाठी प्रक्रिया सोपी केली आहे. या नवीन व्यवस्थेत केवळ पेंडिंग क्लेमचा निपटारा आता झटपट होईल. विम्याचा दावा झटपट निकाली लागणार असल्याने मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला लवकरच आर्थिक मदत होईल.

वारसदारांची प्रक्रिया डिजिटल

जुन्या पद्धतीत मयत शेतकऱ्यांच्या उत्तराधिकारी, वारसदाराची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वर्षही निघून जात होते. कागदपत्रे वेळेत दाखल केल्यावरही पुढील प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागत होता. नवीन नियमानुसार, आता वारसदाराच्या पडताळणीची प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे वेळखाऊ प्रक्रियेला लगाम लागला आहे. विमा अर्ज भरताना वारसदाराची माहिती, त्याची कागदपत्रे, आधारकार्ड आणि इतर माहिती तसेच बँक खात्याची सविस्तर माहितीचा लागलीच पडताळा करण्यात येणार आहे. जर वारसदाराची माहितीचा पडताळा करण्यात अचडण येत असल्यास स्थानिक महसूल अधिकाऱ्याच्या मदतीने ही प्रक्रिया सुद्धा झटपट पूर्ण होईल. यामुळे सतत कागदपत्रांची मागणी करण्यात येणार नाही.

योजनेतील दलाल होणार हद्दपार

या आधुनिक आणि डिजिटल पद्धतीमुळे क्लेम पास करून देण्यासाठीच्या दलालांची मध्यस्थी राहणार नाही. कागदपत्रे अपडेट केल्यावर विमा रक्कम थेट मयत शेतकऱ्याच्या वारसदाराच्या बँक खात्यात जमा होईल. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने ही रक्कम जमा होईल. आधार कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन जमा केल्यावर लागलीच पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी