AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : माळरानावर आंबा बाग बहरली मात्र, वाढत्या उन्हामुळे फळधारणेत घट झाली

मराठवाड्यातील शेतकरी हे पारंपरिक पिकांवरच भर देतात. मात्र, शंकर सज्जन यांनी तब्बल 15 वर्षापूर्वीच शेती व्यवसयामध्ये बदल करुन आंबा फळबागेची जोड दिली होती. माळरानावर विविध जातींची 50 आंब्याची झाडे लावली. एवढेच नाही तर आंब्याला पाणीपुरवठा होईल याचे नियोजनही केले होते. त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून वर्षाकाठी 2 लाखाचे उत्पन्न हे ठरलेलेच होते.

Nanded : माळरानावर आंबा बाग बहरली मात्र, वाढत्या उन्हामुळे फळधारणेत घट झाली
हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पावसाचा आणि अंतिम टप्प्यात अधिकच्या उन्हामुळे आंबा उत्पादनावर परिणामImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 12:20 PM
Share

नांदेड : उत्पादनवाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग नांदेड जिल्ह्यातील सुजेगाव येथील शंकर सज्जन यांनी केला होता. त्यांनी माळरानावर (Mango Orchard) आंबा बाग बहरण्याची किमया ही 15 वर्षापूर्वीच केली होती. काळाच्या ओघात त्यांचा हा जोड व्यवसायच मुख्य व्यवसाय बनला होता. केवळ एका जातीचेच नाही तर विविध जातींच्या (Mango Cultivation) आंब्याची लागवड केल्याने वर्षाकाठी 2 लाखाचे (Production) उत्पन्न हे ठरलेले होते. यंदा मात्र, त्यांनाही बदलत्या वातावरणाचा फटका बसलेला आहे. हंगामाच्या सुरवातील अवकाळी आणि ढगाळ वातावरण आणि आता अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हाच्या झळा यामुळे आंबा पिकाचे तर नुकसान झालेच आहे पण गुणवत्तेवरही परिणाम झाल्याने उत्पन्न आणि उत्पादन घटले आहे.

माळरानावर विविध जातीच्या आंब्याची फळबाग

मराठवाड्यातील शेतकरी हे पारंपरिक पिकांवरच भर देतात. मात्र, शंकर सज्जन यांनी तब्बल 15 वर्षापूर्वीच शेती व्यवसयामध्ये बदल करुन आंबा फळबागेची जोड दिली होती. माळरानावर विविध जातींची 50 आंब्याची झाडे लावली. एवढेच नाही तर आंब्याला पाणीपुरवठा होईल याचे नियोजनही केले होते. त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून वर्षाकाठी 2 लाखाचे उत्पन्न हे ठरलेलेच होते. यंदा मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. गेल्या 15 वर्षाची मेहनतीचे यंदा काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ऊन-पावसाच्या खेळात शेतकरी मेटाकुटीला

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. आंबा हंगाम सुरु होताच अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळे मोहर गळती झाली होती. तर फळधारणा होत असतानाच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबागळती झाली होती. त्यामुळे सुरवातीच्या दोन हंगामातील पीक तर शेतकऱ्यांच्या पदरी पडलेच नाही. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना आता उन्हाचा पारा वाढल्याने आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. फळधारणेत घट झाली असून गुणवत्ताही ढासळली आहे. ऊन – पावसाच्या खेळात खरीप-रब्बी हंगामातील उत्पादन तर घटलेच पण फळबागांवरही त्याचा परिणाम झाला आहे.

10 वर्षातील उत्पादनात यंदाच खंड

नांदेड जिल्ह्यातील सुजलेगांव इथल्या शंकर सज्जन यांनी माळरानावरच आंबा बाग जोपासली आहे. शिवाय वर्षाभराचे नियोजन आणि आंबा झाडांची निघराणी यामुळे वर्षाकाठी 2 लाखाचे उत्पादन हे ठरलेलेच होते. शेतील जोडव्यवसाय म्हणून सुरु केलेली आंबा फळबागच आज मुख्य व्यवसाय झाली आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे रब्बीच्या उत्पादनात तर घट झालीच आहे पण आता आंबा अंतिम टप्प्यात असाताना वाढत्या उन्हामुळे फळगळ सुरु झाली आहे. शिवाय जमिनीवर पडलेला आंबा हा उन्हामुळे भाजला जात आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून उत्पन्न मिळत होते त्यामध्ये यंदाच घट झाली आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.