AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dry Drought : जलसाठे आटले, पाण्याचा प्रश्न भीषण, भर हिवाळ्यात वैशाख वणवा, मराठवाड्यावर दुष्काळाची गडद छाया, सरकारी पंचनाम्यांना मुहूर्त केव्हा?

Marathwada Dry Drought: दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाड्यात जलसाठ्याची चिंता वाढली आहे. अनेक लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणी साठे कमी होत असल्याने चिंता वाढली. हिवाळ्यात रखरखत्या उन्हाने लाही लाही होत आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील 25% पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याने नाराजी आहे.

Dry Drought : जलसाठे आटले, पाण्याचा प्रश्न भीषण, भर हिवाळ्यात वैशाख वणवा, मराठवाड्यावर दुष्काळाची गडद छाया, सरकारी पंचनाम्यांना मुहूर्त केव्हा?
मराठवाड्यावर दुष्काळाची गडद छाया
| Updated on: Oct 06, 2026 | 8:32 AM
Share

मराठवाड्यात दु्ष्काळाने राहुटी ठोकली आहे. जलस्त्रोत आटत आहेत. आठही जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणी कमी होत आहे. काही प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर जायकवाडी आणि काही प्रकल्पात जलसाठा आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी कोसोदूर जावे लागत आहे. महिलांच्या डोई हांड्यांची उतरंड वाढली आहे. हिवाळ्यातच वैशाख वणवा पेटला आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील 25% पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याने सरकारी दप्तर दिरंगाईविरोधात नाराजी पसरली आहे.

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये जलसंकट

मराठवाड्यात यंदा पाणीसाठ्याची चिंता वाढताना दिसत आहे. मराठवाड्यातील तब्बल 78 लघु सिंचन प्रकल्प कोरडे पडले असून, 4 मध्यम तलावांमध्येही पाण्याचा थेंब उरलेला नाही. मध्यम आणि लघु प्रकल्पांचा सरासरी जलसाठा 19 टक्क्यांखाली आला आहे. विशेष म्हणजे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यातील धरणांची स्थिती तुलनेने चांगली असली, तरी 3 धरणे कोरडी पडली आहेत. मराठवाड्यातील 18 मध्यम आणि 300 लघु सिंचन प्रकल्पांपैकी तब्बल 318 प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत, तर 215 धरणांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात शेती आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील गल्हाटी मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडा ठाक पडला आहे. 15 ते 20 गावांवर पाणी टंचाईचं गंभीर संकट आहे. शिवाय जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रकल्पाला मोठ्या भेगा पडल्याने दुष्काळाचे भयावह चित्र समोर आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ ६२ टक्के पाऊस पडला. २२५ पैकी ५० प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यातील ११४ गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत. २१२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून ६ गावांना ८ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. प्रकल्पांमध्ये केवळ ६.५१ टक्के उपयुक्त पाणी साठा आहे. जिल्ह्यात ८३ विहीर अधिग्रहण प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहे. ऑक्टोबरमध्ये पाऊस न झाल्यास नोव्हेंबरपासून टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यताआहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे जनतेला आश्वासन दिले आहे. पाणीटंचाई, रोजगार हमी आणि चारा टंचाईबाबत नागरिकांनी काळजी करू नये, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांने स्पष्ट केले.

मराठवाड्यातील 25% पिकांचे पंचनामे पूर्ण

मराठवाड्यात यंदा दुष्काळी परिस्थितीचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने शासनाच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत मराठवाड्यातील 13 लाख 15 हजार 256 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 25.14 टक्के आहे. मराठवाड्यात खरीप पिकांसह फळबागांचे एकूण 52 लाख 32 हजार 474 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 3 हजार 586 गावांतील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्हानिहाय पाहिलं तर जालना जिल्ह्यात सर्वाधिक 47 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 13.75 टक्के, बीडमध्ये 26.05 टक्के, लातूरमध्ये 27.40 टक्के, धाराशिवमध्ये 21.98 टक्के, नांदेडमध्ये 13.41 टक्के, परभणीत 33.03 टक्के आणि हिंगोलीत 19.02 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?