10 हजार रुपयांमध्ये काळी मिरची शेतीला सुरुवात, आता वर्षाला 19 लाखांची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा

भारत सरकारनं नानादर बी मारक यांच्या काळी मिरची शेतीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे. Meghalaya farmer Nanadar B Marak

10 हजार रुपयांमध्ये काळी मिरची शेतीला सुरुवात, आता वर्षाला 19 लाखांची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा
नादर बी मारक
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 11:21 AM

नवी दिल्ली: मेघालय राज्यातील शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोगांद्वारे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देतात. मेघालयमधील काळ्या मिरचीच्या शेतीतून शेतकऱ्यांनी यश मिळवलं आहे. मेघालयमधील नानादर बी मारक या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला आहे. नानादर बी मारक त्यांच्या शेतीमध्ये जैविक पद्धतीनं काळी मिरचीची शेती करतात. ते मेघालयातील पश्चिम गारो टेकड्यांच्या भागात राहतात. या परिसरात काळ्या मिरचीची शेती केली जाते. नानादर बी. मारक यांनी 2019 मध्ये 19 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं होतं. (Meghalaya farmer Nanadar B Marak black Pepper farming started from rs 10000 now earning 19 lakh rupees know success story)

5 हेक्टरवर शेतीला सुरुवात

नानादर बी मारक यांना 1980 च्या दशकात सासरच्या लोकांकडून 5 हेक्टर जमीन मिळाली.यामध्ये त्यांनी काळी मिरचीची 3400 झाडं लावली. त्यानंतर त्यांनी 10 हजार रुपये खर्चून 10 हजार झाडं लावली. नानादर यांनी थोड्या कालावधी नंतर झाडांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. सुरुवातील रासायनिक खतांचा वापर करणाऱ्या नानादर यांनी त्यानंतर जैविक शेतीचा मार्ग स्वीकारला. नानादर यांचं वय सध्या 61 वर्ष असून मेघालयात त्यांना कृषी अग्रणी म्हणून ओळखलं जातं.

जैविक शेतीला प्राधान्य

नानादर बी मारक यांनी शेती करताना पर्यावरणाची काळजी घेतली. गारो हिल्स टेकड्या पूर्णपणे जंगलाचा प्रदेश आहे. मारक यांनी मोठमोठी झाडं कापण्याऐवजी त्यांचं संवर्धन करत काळी मिरचीच्या शेतीला प्राधान्य दिलं. मारक यांनी त्यांच्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना देखील काळी मिरचीची लागवड करताना मदत केली. नानादर बी मारक यांच्या काळी मिरची संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.

केंद्र सरकारकडून सन्मान

सन 2019 मध्ये नानादर बी मारक यांना काळी मिरची शेतीतून 19 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. भारत सरकारनं नानादर बी मारक यांच्या काळी मिरची शेतीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे.

नानादर बी मारक यांचं शेती तंत्र

काळी मिरचीची लागवड करताना दोन झाडांमध्ये 8 फुटांचं अंतर ठेवतो, असं नानादर बी. मारक सांगतात. दोन झाडांमधील अंतर जास्त ठेवल्यानं उत्पादन जास्त मिळतं आणि मिरची तोडण्यास देखील फायदा होतो, असं मारक सांगतात. प्रत्येक झाडाला गायीच्या शेणापासून बनवलेलं खत आणि वर्मी कंपोस्ट खत दिलं जातं, असं मारक सांगतात.

संबंधित बातम्या

लॉकडाऊन लागल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 63 हजार कोटी, कोणत्या योजनेद्वारे सरकारनं दिले पैसे?

खेडेगावात व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देणार 3.75 लाख रुपये, शेतीची कामे करावी नाही लागणार

(Meghalaya farmer Nanadar B Marak black Pepper farming started from rs 10000 now earning 19 lakh rupees know success story)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.