गारठा बेतला हजारो मेंढ्यांच्या जीवावर, उघड्यावर संसार असलेल्या मेंढपाळाच्या अडचणीत भर

गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात गारठ्यामुळे 20 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते तर पुणे जिल्ह्यात याच गारठ्यामुळे तब्बल 1 हजार 777 मेंढ्या ह्या दगावल्या आहेत तर 600 मेंढ्या ह्या गंभीर जखमी आहेत.

गारठा बेतला हजारो मेंढ्यांच्या जीवावर, उघड्यावर संसार असलेल्या मेंढपाळाच्या अडचणीत भर
अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे पुणे जिल्ह्यात हजारो मेढ्यांचा मृत्यू झाला आहे
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 2:29 PM

पुणे : अवकाळी पाऊस आणि वातावरणातील गारठ्याने केवळ पिकांचेच नुकसान झाले असे नाही तर पशूपालकांनाही मोठा फटका बसलेला आहे. गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात गारठ्यामुळे 20 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते तर पुणे जिल्ह्यात याच गारठ्यामुळे तब्बल 1 हजार 777 मेंढ्या ह्या दगावल्या आहेत तर 600 मेंढ्या ह्या गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मेढपाळांचे संसार हे आता उघड्यावरच आले आहेत. याच मेंढ्यावर मेंढपाळाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो. पण या नैसर्गिक आपत्तीमुळे मेंढपाळांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सर्वाधिक झळ ही जुन्नर तालुक्यातील मेंढपाळांना बसलेली आहे.

मेंढ्या चारण्यासाठी करावी लागते भटकंती

मेंढपाळांकडे शेतजमिन क्षेत्रच नसल्याने चारा साठवणूकीचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे मेंढ्या चारण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते. शिवाय याच मेंढ्याच्या उत्पादनावर मेंढपाळांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो. मात्र, यंदा चाराटंचाईमुळे अधिकतर मेंढपाळ पडिक क्षेत्रात झोपडीमध्ये वास्तव्य करुन मेंढ्या चारण्याचे काम करीत होते मात्र, त्यांचे हातावर असलेले पोट हे नियतीला देखील मान्य झाले नाही आणि एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 777 मेंढ्या ह्या गारव्यामुळे दगावल्याची नोंद प्रशासन दरबारी करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात तालुकानिहाय अशा दगावल्या मेंढ्या

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झळ ही जुन्नर तालुक्यातील मेंढपाळांना बसलेली आहे. कारण या एकाच तालुक्यातील 650 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यानंतर आंबेगाव तालुक्यात 366, शिरुर तालुक्यात 341, पुरंदर तालुक्यात 131, खेड तालुक्यात 84, हवेलीत 18, दौंडमध्ये 24 , मावळ तालुक्यात 93, तर बारामती तालुक्यात 70 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पशूसंवर्धन विभागाकडे झाली आहे.एवढेच नाही तर जिल्ह्यात 600 मेंढ्या ह्या वातावरणामुळे गंभीर जखमी आहेत. या 600 पैकी एकट्या जुन्नर तालुक्यात 300 मेंढ्या ह्या जखमी झालेल्या आहेत.

यामुळे झाला मेंढ्यांचा मृत्यू

दरम्यानच्या काळात मेंढ्याच का दगावल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात पशूसंवर्धन अधिकारी डॅा. शैलेश केंडे यांना विचारले असता गेल्या दोन दिवसाच्या काळात वातावरणात गारठा मोठ्या प्रमाणात होता. मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ हे पडिक क्षेत्रावर तात्पूरत्या स्वरुपाची झोपडी उभारतात. मात्र, मेंढ्यांच्या निवाऱ्याची सोय केली जात नाही किंवा त्याची आवश्यकताही नसते. पण दोन दिवसातील गारवा आणि मेंढ्यांना या काळात ना पाणी मिळाले ना काही अन्न त्यामुळे गारठ्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

आता अपेक्षा शासनाच्या मदतीची

ज्या मेंढ्यावर मेंढपाळ आणि त्यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह सुरु होता त्या मेंढ्याचाच मृत्यू एका रात्रीतून झालेला आहे. याची नोंदही पशूसंवर्धन विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता मेंढपाळांना थेठ आर्थिक मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे. या ठिकाणी पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष मदतीची.

संबंधित बातम्या :

अवकाळीमुळे आंबा बागांचे गणितच बिघडले, हंगाम लांबणीवर अन् उत्पादनातही घट

नवा पर्यायही ‘फेल’ : सुर्यदर्शनच नाही तर सौरऊर्जा कृषीपंपाचा तरी काय उपयोग ? बांधावरचे वास्तव

पावसामुळे शेती कामाला अन् ऊसतोडणीलाही लागले ब्रेक, कोल्हापूरात दोन दिवस ऊसाचे गाळप बंद

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.