AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update :चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD चा नेमका अंदाज काय?

महाराष्ट्रात दोन दिवसापासून पावासाला पुन्हा सुरुवात आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे.

Monsoon Update :चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD चा नेमका अंदाज काय?
konkan rain
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 5:25 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात दोन दिवसापासून पावासाला पुन्हा सुरुवात आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या अंदाजासाठी भारतीय हवामान विभागाचे अपडेटस पाहावेत, असं आवाहन हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं राज्यात 17 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं देखील हवामान विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

14 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती

हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग ठाणे, पालघर, मुंबई आणि धुळेला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

15 जुलै रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई आणि पालघरला येलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

16 जुलैला पावसाचा काय अंदाज

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा,पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार वगळता इतर सर्व जिल्ह्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

17 जुलै रोजी पावसाची काय स्थिती?

हवामान विभागानं 17 जुलै रोजी राज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे तर सातारा, कोल्हापूर आणि रायगडला येलो अ‌ॅलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या:

नांदेडमध्ये ढगफुटी, कोकणतल्या नद्यांना पूर, जळगावात हतनूरमधून पाण्याचा विसर्ग, राज्यात पावसाची स्थिती कशी?

Konkan Rain | राजापुरात रस्त्यावर बोटी उतरवण्याची वेळ, रत्नागिरी, सिंधुदुर्गात धुवाँधार पाऊस

Mumbai rain live Maharashtra weather update today IMD issue heavy and very heavy rain fall in Maharashtra issue red and orange alert to various districts

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.