Maharashtra Rain Update: कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 13, 2021 | 10:56 AM

महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाचं पुनरागमन झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update: कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
सांकेतिक फोटो
Follow us

मुंबई: महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाचं पुनरागमन झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होई शकतो. हवामान विभागनं सोमवारी राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केलेले आहेत. हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

पुढील तीन तासात कुठल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस

भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील सर्व जिल्हे म्हणजेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. तर, हवामान विभागानं सातारा, कोल्हापूर, रायगड, या जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे.

आज तीन जिल्ह्यांसाठी रेड अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं मंगळवारसाठी सातारा, कोल्हापूर, रायगड, या जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, पुणे , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबई, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली सह सपूर्ण विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

14 आणि 15 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती

हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई ला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

16 जुलैला पावसाचा काय अंदाज

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा,पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वसई विरारमध्ये पाऊस

वसई विरार नालासोपाऱ्यात सकाळ पासून पाऊस सुरू झाला आहे. रात्रीपासून अधूनमधून कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. सकाळ च्या वेळेत मात्र आभाळ पूर्णपणे भरलेले असून दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमधील 61 मंडळात अतिवृष्टीचा फटका

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद होत, नदी नाले तुडुंब भरले आहेत. परभणी जिल्ह्यात 276 जनावरं वाहून गेली आहेत. मागील 24 तासात बीड, नांदेड, हिंगोली,परभणी जिल्ह्यातील 61 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबाद,उस्मानाबाद,जालना, लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद येथील रहिवासी आईचा आणि मुलाचा औंढा नागनाथ येथील पुरात वाहून जात मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Rain Update: राज्यात येत्या 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, IMD कडून रेड, ऑरेंज ॲलर्ट जारी

“मान्सूनने वेगात आगमन केलं, आता पुन्हा जोर धरावा आणि सर्वत्र राज्यात झोकात बरसावं, नाहीतर पेरण्यांसाठी चिंतेची बाब”

(Mumbai rain live Maharashtra weather update today IMD issue rain alert for Mumbai Palghar Thane Ratnagiri Sindhudurg Raigad and Aurangabad)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI