Maharashtra Rain Update: राज्यात येत्या 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, IMD कडून रेड, ऑरेंज ॲलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Maharashtra Rain Update: राज्यात येत्या 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, IMD कडून रेड, ऑरेंज ॲलर्ट जारी
konkan rain
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 4:01 PM

मुंबई: महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाचं पुनरागमन झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागनं राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केले आहेत. हवामान विभागाचे अधिकारी  के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

कोकणातील जिल्ह्यांसह सातारा कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट जारी केला आहे. पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदगर, जालना औरंगाबादला येलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

मंगळवारी देखील रेड अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं मंगळवारसाठी सातारा, कोल्हापूर, रायगड, या जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, पुणे , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबई, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली सह सपूर्ण विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

14 आणि 15 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती

हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई ला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

16 जुलैला पावसाचा काय अंदाज

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा,पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरीत 115 मिलीमीटर पावसाची नोंद

रत्नागिरीत गेल्या चोवीस तासांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 115 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस आला. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आलाय. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. राजापूर शहरात आता पाणी घुसलं आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस होत आहे.

मुंबईला ऑरेंज अ‌ॅलर्ट

मुंबईतही पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई शहरात पावसाने काही दिवसापासून विश्रांती घेतलेली होती आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेले आहे मुंबईचा सर्वच भागात जोरदार पाऊस पडतोय हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

कोकणात मुसळधार पाऊस

कोकणात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रात्री जोरदार पाऊस पडला तर सकाळ पासून काही भागात संततधार तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सखल भागात पाणी साठले असून अनेक भागातील शेती ही पाण्याखाली गेली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ही मुसळधार पाऊस पडत असून या पावसाने चिपळूण भागाला झोडपून काढले आहे .तर, राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला पूर आला असून राजापूर बाजारपेठेत तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. हवामान विभागाने ही दोन दिवसात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला असून रेड अ‌ॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे.तळकोकणात असाच पाऊस पडत राहिला तर जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या: Konkan Rain | राजापुरात रस्त्यावर बोटी उतरवण्याची वेळ, रत्नागिरी, सिंधुदुर्गात धुवाँधार पाऊस

‘माझ्यात ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता, पण महाराष्ट्रीयन असल्याने कॅम्पबाहेर काढले’

Mumbai rain live Maharashtra weather update today live updates of Rain IMD issue Red alert with five day forecast of Maharashtra

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.