झुकिनी…. ‘फायद्याचा’ विदेशी भाजीपाला, नांदेडच्या शेतकऱ्याने बक्कळ कमावले!

नांदेडमध्ये एका शेतकऱ्यांने झुकिनी या विदेशी फळभाजीची यशस्वी शेती केलीय. | Nanded farmer planted zucchini

  • राजीव गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड
  • Published On - 8:57 AM, 27 Jan 2021
झुकिनी.... 'फायद्याचा' विदेशी भाजीपाला, नांदेडच्या शेतकऱ्याने बक्कळ कमावले!
Nanded farmer planted Zukini crop

नांदेड : नांदेडमध्ये एका शेतकऱ्यांने झुकिनी या विदेशी फळभाजीची यशस्वी शेती केलीय. लोहा तालुक्यातील पोखरभोसी इथल्या संजय ताठे या शेतकऱ्याने हा फळ पिकाचा यशस्वी प्रयोग केलाय. मागील दोन वर्षापासून संजय ताठे झुकीनी या फळ भाजी पिकाची लागवड करतायत. (Nanded farmer planted zucchini crop foreign vegetable)

झुकिनी फळभाजीची बीज प्रक्रियेसाठी ते लागवड करीत आहेत. अमेरिका देशातली लोकं मोठ्या प्रमाणात झुकिनीचा भाजीसाठी उपयोग करतात. मात्र असं असलं तरी इटलीत या फळभाजीचं सर्वाधिक उत्पादन होतं. झुकिणी हा आपल्या ‘फायद्याचा’ विदेशी भाजीपाला आहे हे लक्षात आल्यावर नांदेडच्या संजय ताठे यांवी आपल्या शेतात या पिकाची लागवड केली.

“आपल्या वातावरणात देखील उत्तम प्रकारे हे पीक येतं. या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅलरीज आणि खनिज प्रथिने मिळतात”, अशी माहिती संजय ताठे या शेतकऱ्याने दिलीय. मात्र आपल्या देशात याचा खाण्यासाठी लोक वापर करत नसल्याने ते बीज उत्पादन करून यातून वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत

झुकिनी या फळ भाजीला क्युकरबिटा पेपो (Cucurbita Pepo) तसेच कोर्टगेट (Courgette) नावाने जगभरात ओळखल्या जाते. औषधी गुणधर्मामुळे ही फळभाजी अनेक आजारावर रामबाण औषध म्हणून ओळखली जाते.

झुकिनीमध्ये दोन प्रकार आहेत. एक हिरव्या रंगाची तर एक पिवळ्या रंगाची…झुकिनीच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव लगेच होतो म्हणून वारंवार किटकनाशके फवारावी लागतात. कमी कालावधी आणि बाजाराची स्थिती पाहून झुकिनी पिकाची लागवड करुन संजय ताठे यांनी कोरोनाच्या काळातही चांगलं उत्पन्न मिळवलंय.

झुकिनीची वैशिष्ट काय…?

झुकिनी हे काकडीवर्गीय पीक आहे.
झुकिनी हे मूळत: अमेरिकेतील पिक आहे मात्र इटलीत या पिकाचं सर्वाधिक उत्पादन होतं.
विविध विदेशी व्यंजनांमध्ये तसंच दक्षिण भारतातील व्यंजनामध्ये झुकिनीचा वापर केला जातो.
पंचतारांकित हॉटेल्समध्ये झुकिनाला मोठी मागणी आहे.
लागवडीनंतर अवघ्या महिन्याभरात हे पीक कापणीला तयार असतं.
झुकिनी पिकाला बाजारात दर चांगला आहे.

हे ही वाचा :

आंबा फळबाग लागवडीतून लाखो रुपये कमावणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा

पाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा

सांगलीत हळद सौद्यांना सुरुवात, सेलम हळदीवर पहिल्याच बोलीला मिळाले….