AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येहून येताच मुख्यमंत्र्यांनी ज्या जिल्ह्याला भेट दिली, तिथला नुकसानीचा अहवाल रात्रीतून आला, पाहा काय आहेत आकडे?

जिल्ह्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासन पातळीवर जोरदार हालचाली वाढल्या आहेत.

अयोध्येहून येताच मुख्यमंत्र्यांनी ज्या जिल्ह्याला भेट दिली, तिथला नुकसानीचा अहवाल रात्रीतून आला, पाहा काय आहेत आकडे?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 11, 2023 | 12:39 PM
Share

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झाले होते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याच दरम्यान राज्यात शेतकऱ्यांवर संकट आलेले असतांना मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अयोध्येत देवेदर्शन सुरू होते. त्याच वेळेला राज्यातील विरोधकांनी टीका सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी थेट नाशिक गाठलं होतं. नाशिकच्या सटाणा भागात केलेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यामध्ये लवकरात लवकर पंचनामे करून मदत केली जाईल शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

त्यानंतर एक रात्रीतून कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाला प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याकडून हा अहवाल पाठविण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात 7 ते 9 एप्रिल या काळात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून तब्बल 208 गावांचा यामध्ये समावेश आहे.

नाशिक जिलयातील जवळपास 25 हजर 985 शेतकऱ्यांचे नुकसान यामध्ये झाल्याचा प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसाच्या पावसात शेतकऱ्यांचे तब्बल 12 हजार 909 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले असून 10 हजार 725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला आहे. काढणीला आलेला कांदा तर काढून गंजी करून ठेवलेला कांदा सुद्धा खराब होणार आहे.

कांद्या खालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टरवरील द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. एकूणच फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. अक्षरशः कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत असतांना अवकाळीचे संकट कोसळले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावर आलेले असताना शेतीचं झालेले नुकसान पाहता त्यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला फटका पाहून लवकरात लवकर मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले होते.

त्याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेला अहवाल बघता संपूर्ण जिल्हयातील शेतकरीच जवळपास अडचणीत सापडले आहे. त्यामुळे प्राथमिक अहवाल शासन दरबारी एका रात्रीतून गेल्यानंतर प्रत्यक्षात मदत कधी मिळते याकडे लक्ष लागून आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.