VIDEO | द्राक्षाची बाग तोडून कारल्याची लागवड, शेतकऱ्याला लाखोंचा फायदा

येवल्यातील एका शेतकऱ्याला कारल्याच्या पिकामुळे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. द्राक्षाची बाग तोडून शेतात कारले लावलेल्या त्या शेतकऱ्याला लाखोंचा फायदा झाला आहे.

VIDEO | द्राक्षाची बाग तोडून कारल्याची लागवड, शेतकऱ्याला लाखोंचा फायदा
Yeola Farmer Cultivation of Bitter melon
उमेश पारीक

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 26, 2021 | 4:12 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात कोकण ,पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र येवल्यातील एका शेतकऱ्याला कारल्याच्या पिकामुळे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. द्राक्षाची बाग तोडून शेतात कारले लावलेल्या त्या शेतकऱ्याला लाखोंचा फायदा झाला आहे. (Nashik Yeola Farmer Cultivation of Bitter melon get benefits the farmer by lakhs)

मुसळधार पावसामुळे राज्यात नवे संकट

राज्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.

द्राक्षाची बाग तोडून कारल्याचे पीक

मात्र अशापरिस्थिती एका शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळवलं आहे. येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील शेतकरी नवनाथ लभडे यांनी आपल्या शेतातील द्राक्षाचा बाग तोडून त्याठिकाणी कारल्याचे पीक घेतले. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळला आहे. शेतकरी नवनाथ लभडे यांनी एक एकर शेतामध्ये कारल्याचे पीक घेतलं होतं.

या कारल्याचे पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी त्यांना 70 हजार रुपये खर्च आला होता. त्यांनी आतापर्यंत 350 कॅरेट कारले विकले आहे. त्यामुळे त्यांचा सर्व खर्च हा वसूल झाला आहे. तसेच यापुढे अडीच हजाराच्या आसपास कॅरेट कारले विकले, तर त्यातून त्यांना साडेचार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे शेतकऱ्याचे म्हणणं  आहे.

पाहा व्हिडीओ :

(Nashik Yeola Farmer Cultivation of Bitter melon get benefits the farmer by lakhs)

संबंधित बातम्या : 

कोल्हापूरमध्ये पोल्ट्रीत ओढ्याचं पाणी घुसलं, शेतकऱ्याचं 8 ते 10 लाखांचं नुकसान

महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीच्या कामाला सुरुवात, आदिवासी बांधवांची लगबग

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, पावसानं पिकं पिवळी पडली, कापूस, सोयाबीनला धोका

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें