Aurangabad : शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँकांना आदेश, भागवत कराड घेणार बँकाच्या अधिकाऱ्यांची बैठक; मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती

शेती व्यवसायात सर्वाच मोठी अडचण आहे ती भांडवलाची. शेतकऱ्यांकडे खेळते भांडवलच नसल्याने विविध समस्या निर्माण होतात. शिवाय बॅंकेकडूनही वेळेत कर्ज उपलब्ध होत नाही. बॅंकांना कर्जपुरवठा करताना नेमक्या काय अडचणी आहेत. याचा खुलासा आता करावा लागणार आहे. त्याअनुशंगा्ने खा. भागवत कराड हे आता बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतील.

Aurangabad : शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँकांना आदेश, भागवत कराड घेणार बँकाच्या अधिकाऱ्यांची बैठक; मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9
दत्ता कानवटे

| Edited By: राजेंद्र खराडे

Jul 31, 2022 | 1:50 PM

औरंगाबाद : राज्यात सर्वाधिक (Farmer suicides) शेतकरी आत्महत्या ह्या मराठवाडा विभागात होतात. हे दरवर्षीचे चित्र आहे. मात्र, शिंदे सरकारची स्थापना होताच त्यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हेच आपले धोरण असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आज मराठवाडा दौऱ्यावर असताना (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय घोषणा करणार याकडे शेतकऱ्यांसह राज्याचे लक्ष लागले होते. शेतकरी आत्महत्या होऊच नये म्हणून प्रशासकीय स्तरावर एक यंत्रणा उभी केली जाणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या हा मोठा प्रश्न असून शेतकऱ्यांवरील संकट टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तर शेतकऱ्यांना वेळेत (Farmer Loan) कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले गेले आहेत. यासंदर्भातील बैठका आता खा. भागवत कराड हेच घेणार असल्याने शेतकऱ्यांची अडवणूकही होणार नसल्याचे त्यंनानी सांगितले आहे.

वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास टळणार समस्या

शेती व्यवसायात सर्वाच मोठी अडचण आहे ती भांडवलाची. शेतकऱ्यांकडे खेळते भांडवलच नसल्याने विविध समस्या निर्माण होतात. शिवाय बॅंकेकडूनही वेळेत कर्ज उपलब्ध होत नाही. बॅंकांना कर्जपुरवठा करताना नेमक्या काय अडचणी आहेत. याचा खुलासा आता करावा लागणार आहे. त्याअनुशंगा्ने खा. भागवत कराड हे आता बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तर मार्गी लागतीलच पण वेळेत पैसे हाती पडले तर शेतकऱ्यांच्या समस्याही मिटतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

औपचारिकता नको रिझल्ट हवा..

बॅंकांच्या नियम-अटींमुळेच शेतकरी हे कर्जासाठी बॅंकांकडे फिरकत नाहीत. वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घेतले जाते पण बॅंकेची पायरी चढली जात नाही. मात्र, बॅंकांनी नियम-अटींवर बोट न ठेवता शेतकऱ्यांना कर्ज सहज उपलब्ध होईल असे प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचअनुशंगाने आता मराठवाड्याचा आढावा खा. भागवत कराड हे घेणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील का हे देखील पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

पीक कर्जाच्या उद्दिष्टापासून बॅंका दूर

खरीप हंगमात शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या होत्या. त्याअनुशंगाने उद्दिष्टही ठरवून देण्यात आले होते. पण जिल्हा मध्यवर्ती बॅंक वगळता इतर कोणत्याही बॅंकेने उद्दिष्टपूर्ण केले नाही. त्यामुळे बॅंक अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची जबाबदारी ही भागवत कराड यांच्यावर दिल्याने आता कर्ज वाटपाला गती येणार का हे पहावे लागणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें