Seed Production: आता बिजोत्पादनावरही ‘संक्रात’, कशामुळे होतेय कांद्याचे रोप नष्ट ?

Seed Production: आता बिजोत्पादनावरही 'संक्रात', कशामुळे होतेय कांद्याचे रोप नष्ट ?
ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

वातावरणातील बदलामुळे उभ्या पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आगामी हंगामात लागवडीसाठी तयार करण्यात येणाऱ्या कांद्याच्या रोपावरही परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झालीच आहे पण ढगाळ वातावरणामुळे बिजोत्पादनासाठी घेतलेल्या डेंगळ्यावर करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे.

राजेंद्र खराडे

|

Jan 28, 2022 | 1:25 PM

नाशिक : वातावरणातील बदलामुळे उभ्या पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आगामी हंगामात लागवडीसाठी तयार करण्यात येणाऱ्या कांद्याच्या रोपावरही परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून (Winter) थंडीत वाढ झालीच आहे पण ढगाळ वातावरणामुळे (Seed Production) बिजोत्पादनासाठी घेतलेल्या डेंगळ्यावर करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होत आहे पण आगामी हंगामात कांदा लागवड करावी कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. देवळा तालुक्यात अनेक शेतकरी हे (Onion Crop) कांद्याच्या बिजोत्पादनावर भर देतात. शिवाय घरगुती पातळीवर केलेले बिजोत्पादन हेच चांगले असल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे दर्जेदार कांद्याची निवड करुन त्याची कंड लागवड बियाणे तयार कऱण्यासाठी करतात. मात्र, यंदा या रोपासाठी घेतल्या जात असलेल्या बिजोत्पादनावरच रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे.

करप्याच्या प्रादुर्भावामुळे नुकसान

बिजोत्पादनासाठी चांगला कांदा हा मध्यभागी कापून लावला जातो. सध्या यासाठी लावेलेल्या कांद्याची पात, गोंडे येण्यापूर्वीच करपून नष्ट होत आहे. ढगाळ वातावरणामुळे यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थेट डेंगळा कांदा नष्टच करुन टाकला आहे. त्यामुळे रोप लागवडीपैकी पेरणीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरणार नाही. परिणामी अधिकचे उत्पादन हे रोपाची लागवड करुन होत असते त्याला मुकावे लागणार आहे.

आता कांद्याचीही टंचाई

बिजोत्पादन करण्यासाठी चांगल्या कांद्याची आवश्यकता असते. उन्हाळी हाच चांगला कांदा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वीच कांद्याची विक्री करण्यात आली आहे. शिवाय बिजोत्पादन झाल्याने कांद्याची साठवणूकही शेतकऱ्यांनी केली नाही. मात्र, आता करपा रोगाने नुकसान झाले असून आता नव्याने बिजोत्पादन करावे कसे असा सवाल आहे.

बिजोत्पादनाच्या दोन पद्धती

* रोपे लावून कांदे न काढता तसेच शेतात ठेऊन त्यांना फुले येऊ दिली जातात. या पद्धतीमध्ये खर्च कमी होतो, परंतु उत्पादनही कमी येते. कांदा जमिनीतून काढला जात नाही, त्यामुळे त्याची योग्य निवड करता येत नाही. त्यामुळे दर्जाहीन कांद्याचे प्रमाण वाढत जाते त्याचबरोबर रोगाचे व तणांचे प्रमाण वाढते. या पद्धतीमध्ये केवळ खरीप जातीचेच बी तयार करता येऊ शकते. अनेक अडचणी व त्रुटीमुळे ही पद्धत फारशी वापरली जात नाही.

* तर दुसऱ्या या पद्धतीत एका हंगामातील कांदा काढून तो साठवून, निवड करून दुसऱ्या हंगामात लावून बीजोत्पादन केले जाते. या पद्धतीमध्ये बियांचे उत्पादन जास्त येते, कांद्याची निवड करता येते. निवड केलेले कांदे लावल्यामुळे दरवर्षी नवीन पिढी सुधारत जाते. रब्बी हंगामाचे कांदे साठवून ठेवावे लागतात, त्यामुळे साठवण खर्च वाढतो. मात्र वाढीव उत्पादनामुळे हा खर्च नगण्य वाटतो.

संबंधित बातम्या :

भांडगावच्या गाजराची चवच न्यारी, शेतकऱ्यांना कळाले ‘झिरो बजेट’ शेतीचे महत्व

आठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या

ऊसशेती करणाऱ्या सदाशिवनं शेतात थेट गांजा पिकवला! पोलिसांनी त्यावर नांगर फिरवला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें