आठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या

आठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या
भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने आठवडी बाजारात मेथीच्या जुड्या भिरकावून दिल्या

मधला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली मात्र, त्यालाही कोरोनाचा अडसर ठरत आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लातूर जिल्ह्यातील आठवडी बाजार हे बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकलेलं विकावं कुठं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

महेंद्र जोंधळे

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 28, 2022 | 12:06 PM

लातूर : यंदा वातावरणातील बदलामुळे शेती गणितच बिघडलेले आहे. खरिपातील पिकांचे अतिवृष्टीमुळे तर आता (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे अवकाळी आणि सततच्या (Change Climate) वातावरणातील बदलामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. यामुळे मधला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली मात्र, त्यालाही कोरोनाचा अडसर ठरत आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लातूर जिल्ह्यातील (Weekly Market) आठवडी बाजार हे बंद आहेत. त्यामुळे शेतात पिकलेलं विकावं कुठं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. असे असतानाही भाजीपाल्याच्या विक्रीतून चार पैसे मिळतील म्हणून मोठ धाडस करुन शेतकऱ्याने किनगावच्या आठवडी बाजाराचे ठिकाण गाठले पण मेथी खरेदीसाठी कोणीच फिरकले नाही. दिवसभर थांबून एक जुडीही विकली नाही म्हणून शेतकऱ्याने मेथीची भाजी चक्क रस्त्यावर फेकणेच पसंत केले. त्रस्त शेतकरी मेथीच्या जुड्या भिरकावून टाकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पोते भरुन आणली मेथी मात्र, एकाची विक्री नाही

मुख्य पिकांतून नाही किमान भाजीपाल्यातून का होईना चार पैसे मिळतील हा आशावाद कायम शेतकऱ्यांना राहिलेला आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे. सध्या आठवडी बाजारावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही काढलेला शेती माल काय करायचा म्हणून किनगावच्या जवळपासचे शेतकरी हे आठवडी बाजारादिवशी येऊन भाजीपाल्याची विक्री करतात. मात्र, मेथी खरेदीसाठी कोणी फिरकलेच नाही. त्यामुळे बाजारात आलेला शेतकरी त्रस्त झाला होता. दिवसभर थांबून एकही मेथीची जुडी विकली नाही याची सल त्याच्या मनात होती. शिवाय आता भाजीपाला घरी नेऊन तरी काय उपयोग म्हणून त्याने भर बाजारातच मेथीच्या जुड्या भिरकावण्यास सुरवात केली. शिवाय कोणी पडलेली जुडी घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यास तो घेऊ देत नव्हता असे व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

बीडनंतर लातूरात घडला प्रकार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या आठवडी बाजार हे बंद आहेत. त्यामुळे भाजीपाला विक्री करायचा कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करतात. त्यामुळे शेतकरी प्रशासनाचा विरोध असतानाही विक्रीसाठी दाखल होत आहे. असाच प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरामध्ये घडला होता. शेतकऱ्यास भाजी विक्रीसाठी बसू दिले नसल्याने त्याने सर्व भाजीपाला हवेत भिरकावून दिला होता. तर आता लातून जिल्ह्यातील किनगाव येथे हा प्रकार समोर आला आहे. तीन महिने कष्टाने फुलवलेली मेथी अशाप्रकारे फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढावली आहे.

मग आठवडी बाजारालाच का विरोध?

कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम पार पडत आहेत. शिवाय आता बाजारपेठाही सर्व खुल्या आहेत. शाळाही सुरु झाल्या आहेत असे असतानाच आठवडी बाजारालाच का विरोध होत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. भाजीपाला हा अत्यावश्यकमध्ये असतानाही याला विरोध होत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season: वातावरण निवळले, शेतकऱ्यांना आता खतांची चिंता, चढ्या दराने होतेय विक्री

Banana : केळी उत्पादकांना दुहेरी फटका, बागांचे नुकसान अन् थंडीमुळे मागणीही घटली

Onion : कांदा लागवडीच्या योग्य पध्दती, कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें