Onion : कांदा लागवडीच्या योग्य पध्दती, कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

Onion :  कांदा लागवडीच्या योग्य पध्दती, कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?
उन्हाळी हंगामातील कांदा लागवड

सध्या उन्हाळी हंगामातील कांदा लागवडीची कामे जोमात सुरु आहेत. हीच कांदा लागवडीची योग्य वेळ आहे. मात्र, लागवड करताना योग्य काळजी घेतली तरच पीक जोमात वाढणार आहे. त्यामुळे तयार झालेली रोपे ही 6 आठवड्यापेक्षा जास्त जुनी नसायला पाहिजेत. शिवाय लहान वाफे तयार करुन त्यामध्येच रोपांची लागण करणे महत्वाचे ठरणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 28, 2022 | 7:09 AM

मुंबई : सध्या (Summer Season) उन्हाळी हंगामातील (Onion cultivation) कांदा लागवडीची कामे जोमात सुरु आहेत. हीच कांदा लागवडीची योग्य वेळ आहे. मात्र, लागवड करताना योग्य काळजी घेतली तरच पीक जोमात वाढणार आहे. त्यामुळे तयार झालेली रोपे ही 6 आठवड्यापेक्षा जास्त जुनी नसायला पाहिजेत. शिवाय लहान वाफे तयार करुन त्यामध्येच रोपांची लागण करणे महत्वाचे ठरणार आहे. लागवड करण्यापूर्वी 10 ते 15 दिवस आगोदर एकरी 20 ते 25 टन शेणखत टाकणे गरजेचे आहे. शिवाय शेवटची मशागत करताना मात्र, लागवडीच्या क्षेत्रात 20 किलो नायट्रोजन, 60-70 किलो फॉस्फरस आणि 80-100 किलो पोटॅश घाला. अधिक खोलावर रोपांची लागवड करू नये शिवाय दोन ओळीतील अंतर हे 15 सेंमी व वनस्पतीमधील अंतर हे 10 सें.मी. असणे गरजेचे आहे. त्याचा उत्पादनवाढीसाठी अधिकचा फायदा होणार आहे. कांदा लागवडीबरोबर (Advice from Agronomists) भारतीय कृषी संशोधन संस्थेतील (IARI) शास्त्रज्ञांनीही बदलत्या वातावरणाबद्दल आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दलही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. 30 जानेवारी पर्यंत वातावरणात असाच बदल राहणार आहे. त्यामुळे पिकांना पाणी द्यावे मात्र, कोणत्याही प्रकारची फवारणी कामे करु नये असा सल्ला देण्यात आला आहे. कोरोनाचा तीव्र प्रसार लक्षात घेता शेतकऱ्यांनी तयार भाजीपाला तोडणी व इतर शेतीच्या कामांदरम्यान मास्कचा वापर करावा व योग्य अंतर ठेवावे, असे कृषी भौतिकशास्त्र विभागाच्या कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

मोहरीवर चेपा कीडीचा प्रादुर्भाव

वातावरणातील बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर पाहवयास मिळत आहे. यंदा मोहरीचे क्षेत्र वाढलेले आहे. अशातच मोहरी पिकावर चेपा कीडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कामाबरोबरच पिकांवर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे. प्रादुर्भाव झालेली रोपे बाजूला काढून टाकणेच फायद्याचे राहणार आहे. ज्यामुळे त्याचा संसर्ग इतर पिकांवर होणार नाही. हरभरा पिकातील घाटीअळीचा बंदोबस्त महत्वाचा आहे तर भोपळ्याचे उत्पादन घेण्याासाठी बियांचे बियाणे तयार करून ते लहान पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवणे गरजेचे आहे.

भाजीपाल्यावरील कीडीचे व्यवस्थापन

या हंगामात तयार केलेली कोबी, फुलकोबी, बाळे कोबी इत्यादींच्या रोपांची लागवड करता येते. तर पालक, धणे, मेथीची पेरणी करण्यासाठी पोषक वातावरण आहे. याकरिता मात्र, लागवडीसाठी एकरी 20 किलो युरियाची फवारणी केली तर उत्पादनात वाढ होणार आहे. सध्याचे हवामान लक्षात घेऊन बटाटा, टोमॅटो या झुलसा रोगावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याची लक्षणे दिसताच कोरड्या वातावरणात इंडोफिल-एम-45 हे 2 मिली पाणी किंवा मेन्कोझेब 2.0 ग्रॅमलिटर पाण्याची फवारणी करावी.

झेंडूची फुले सडत असतील तर?

कोबी पिकातील डायमंड बॅक सुरवंट, मटारमधील शेंगा आणि टोमॅटोतील कीड यावर लक्ष ठेवण्यासाठी शेतात फेरोमोन ट्रॅप एकरी ३-४ बसवावेत शिवाय वातावरणातील बदलामुळे झेंडूच्या पिकात फूल सडण्याच्या धोका असतो. अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास बाविस्टिन 1 ग्रॅम 1 लीटर किंवा इंडोफिल-एम 45 2 मिली/ 1लिटर पाण्यात मिसळा आणि कोरड्या वातावरणात फवारणी करण्याचा सल्ला कृषितज्ञांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

रंगीत फुलकोबीने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ अन् सर्वसामान्यांना फायदा, काय आहे कृषितज्ञांचे मत?

Cotton: हंगामाच्या सुरवातीपासून कापसाने तारले अंतिम टप्प्यात काय होणार? शेतकरी संभ्रम अवस्थेत

Agricultural Pump : कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित, मागणी 5 हजाराची तोडगा 3 हजारावर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें