AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेच्या 2 कोटी शेतकऱ्यांना पैसे पाठवणं स्थगित, नेमकं कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये 9 ऑगस्टला वर्ग केले होते. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे नऊ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेच्या 2 कोटी शेतकऱ्यांना पैसे पाठवणं स्थगित, नेमकं कारण काय?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 12:10 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये 9 ऑगस्टला वर्ग केले होते. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे नऊ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत 12 कोटी शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. मात्र, सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. तर, 2 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवणे स्थगित करण्यात आलं आहे.

पैसे का स्थगित करण्यात आले

पीएम किसान योजना योजनेसाठी काही अपात्र शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. अपात्र शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. केंद्र सरकारनं आता पीएम किसान योजनेचा अपात्र असतानाही लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यात येत आहेत, अशा तब्बल दोन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवणे थांबवण्यात आले आहेत. जे शेतकरी प्राप्तिकर भरतात त्या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यात येत आहेत. तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यात येत आहेत.

अर्ज कुठे करायचा?

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.

मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता आज जारी होत आहे.

पीएम किसानचा लाभ कुणाला मिळत नाही

  1. शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कर भरल्यास त्याला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. येथे कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत.
  2. एखाद्या शेतकर्‍याची जमीन शेतीयोग्य किंवा व्यावसायिक नसल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  3.  अशा शेतकर्‍यांकडे शेतीयोग्य जमीन नाही, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  4.  जर तुमच्या कुटुंबातील शेतजमीन तुमच्या नावावर नसून तुमच्या आजोबा, वडील किंवा इतर सदस्यांच्या नावावर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
  5.  दुसर्‍याची जमीन भाड्याने देऊन आपण शेती केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  6.  जरी आपण शेतीच्या जमिनीचे मालक असाल, परंतु आपण सरकारी नोकरी करत असाल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  7.  तुम्ही सभासद किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री वगैरे असाल तर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  8. आपण व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट असलात तरीही आपण या योजनेसाठी पात्र होऊ शकत नाही.
  9.  जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला 10,000 रुपये मासिक पेन्शन मिळाली तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  10. जर तुम्ही शेतकरी असाल आणि गेल्या महिन्यात तुम्ही आयकर जमा केला असेल तर तुम्ही या योजनेस पात्र नाही.
  11. जरी तुम्ही नगर परिषदेचे माजी किंवा विद्यमान नगराध्यक्ष, जिल्हा पंचायतचे माजी किंवा विद्यमान अध्यक्ष असाल, तरीही तुम्ही या योजनेस पात्र नाही.
  12. सेवानिवृत्त अधिकारी आणि केंद्र सरकार / राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ / वर्ग चतुर्थ आणि गट डी कर्मचारी वगळता) असाल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

इतर बातम्या:

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार

PM Kisan: पीएम किसान योजनेचा नववा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जारी होणार, 11 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार

PM Kisan scheme displayed installment of more than 2 crore farmers stopped know reason

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.