PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मोठा फटका; 19 नोव्हेंबर रोजी नाही मिळणार 21 वा हप्ता, पीएम किसान योजनेची अपेडट काय?
PM Kisan Yojana 21st Installment: 19 नोव्हेंबर रोजी या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर त्यांचे स्टेट्स ऑनलाईन तपासणे आवश्यक आहे.

PM Kisan Yojana 21st Status: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा त्यामागील उद्देश असतो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही त्यातील एक योजना आहे. ही योजना गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. या योजनेत देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी तीन हप्त्यात दोन हजार असे एकूण 6 हजार रुपये मिळतात.आतापर्यंत या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तर 19 नोव्हेंबर रोजी 21 वा हप्ता देण्यात येणार आहे.
21 वी हप्ता जमा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 नोव्हेंबर, 2025 रोजी पीएम-किसानचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑलनाईन पद्धतीने जमा करतील. देशातील 11 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना 20 हप्त्यांद्वारे 3.70 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहेत. 24 फेब्रुवारी 2019 रोजी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे शेतकऱ्यांना घरबसल्या तपासात येते.
या शेतकऱ्यांना नाही मिळणार हप्ता
केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या 21 व्या हप्त्याविषयीची सुचना देण्यात आली आहे. म्हणजे दोन दिवसानंतर 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा होणार आहे. पण सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. तर जे लाभार्थी आहेत, पण त्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली नसेल, त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा नवीन हप्ता मिळणार नाही.
ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही
ज्यांनी भू-सत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अथवा अर्धवट ठेवली आहे
बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे.
बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला आहे.
शेतकऱ्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे
आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे
तर अशा सर्व शेतकऱ्यांचा हप्ता जमा होणार नाही. हा सर्व चुका दुरुस्त केल्याशिवाय त्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता जमा होणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार नाही.
असे चेक करा स्टेट्स
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता पात्र शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल. योजनेचा फायदा होईल की नाही हे घर बसल्या लाभार्थ्यांना तपासता येईल. pmkisan.gov.in या अधिकृत साईटवर गेल्यावर होमपेजवर Know Your Status हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर सर्व माहिती भरा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स तपासा.
