AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या शेतकऱ्यांनी विसरा पीएम घरकुल योजना, नाही मिळणार लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility : पीएम घरकुल योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना घर तयार करण्यासाठी वा खरेदीसाठी आर्थिक मदत आणि काही प्रकरणात गृहकर्जावरील व्याजात सबसिडी देण्यात येते.

या शेतकऱ्यांनी विसरा पीएम घरकुल योजना, नाही मिळणार लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर
पीएम घरकुल योजना
| Updated on: Jul 01, 2026 | 10:03 PM
Share

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility : आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान घरकुल योजना (PMAY) सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पात्र लोकांना घर बांधण्यासाठी आणि घर खरेदीसाठी आर्थिक मदत आणि काही प्रकरणात गृहकर्जावरील व्याजावर सबसिडी देण्यात येते. अर्थात या योजनेचा लाभ सर्वच लोकांना मिळत नाही. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करताना योजनेचे निकष, अटी आणि नियम जाणून घ्या. काही शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही. का मिळत नाही शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा?

काय आहे पंतप्रधान घरकुल योजना ?

पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात 25 जून 2015 रोजी करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी या दोन्ही क्षेत्रातील गरजवंत कुटुंबांना किफायतशीर दरात पक्के घर बांधण्यासाठी अथवा खरेदीसाठी मदत करणे हे आहे. योजनेतंर्गत घरात पाण्यासाठी नळ जोडणी, शौचालय, वीज आणि इतर पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांचे डोक्यावर छप्परच नाही तर एक चांगले जीवन जगण्यासाठी मदत होते. पंतप्रधान घरकुल योजना दोन भागात विभागण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना -ग्रामीण (PMAY-G) आणि पंतप्रधान आवास योजना-शहरी (PMAY-U) यांचा त्यात समावेश आहे. त्या त्या क्षेत्रानुसार या दोन्ही योजना राबवल्या जातात.

कोणत्या लोकांना मिळतो लाभ?

या योजनेतंर्गत लाभार्थी कुटुंबातील पती, पत्नी आणि अविवाहित मुलं-मुली यांचा समावेश होते. याशिवाय आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS), कमी उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC) आणि महिलांसाठी योजनेत प्राधान्य देण्यात येते. महिलांना घराचे मालक होण्यासाठी सह अर्जदार होता येते.

कोणाला नाही मिळणार घरकुल?

पंतप्रधान घरकुल योजनेचा (Pradhan Mantri Awas Yojana) लाभ त्याच लोकांना मिळतो, जे त्याची पात्रता पूर्ण करतात. ज्या कुटुंबाकडे अगोदच पक्के घर आहे. ज्या शेतकर्‍यांकडे पक्के घर आहे, त्यांना घरकुल योजनैचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय कुटुंबाने केंद्र अथवा राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. तर एखाद्या व्यक्तीने यापूर्वी PMAY व्याज सबसिडी घेतली त्यांना या योजनेचा अथवा सबसिडीचा फायदा घेता येणार नाही. या योजनेचा लाभ केवळ एकदाच घेता येतो.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!