कृषी विधेयकांविरोधात पंजाबमध्ये 'रेल रोको', 14 रेल्वे रद्द, शुक्रवारी राज्यव्यापी बंद

पंजाबमधील शेतकऱ्यांनी कृषी विधेयकांना विरोध करत सरकारविरोधात तीन दिवसीय 'रेल रोको' आंदोलन पुकारलंय. (Panjab farmer rail roko protest farm bill)

कृषी विधेयकांविरोधात पंजाबमध्ये 'रेल रोको', 14 रेल्वे रद्द, शुक्रवारी राज्यव्यापी बंद

चंदीगढ : संसदेत मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकाविरोधात (agri bills) पंजाबमध्ये शेतकरी एकवटले आहेत. शेतकऱ्यांनी विधेयकाला विरोध करत तीन दिवसीय ‘रेल रोको’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी आजपासून  (24 सप्टेंबर) या आंदोलनाला सुरुवात केली आहे. (Panjab farmer rail roko protest against farm bill)

संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकांविरोधात रोष वाढताना दिसतोय. पंजाबमधील शेतकऱ्यांनी विधेयकांना विरोध करत सरकारविरोधात तीन दिवसीय ‘रेल रोको’ आंदोलन पुकारलंय. तसेच शुक्रवारी (25 सप्टेंबर) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. सरकारने कृषी विधेयकांवर वेळीच योग्य निर्णय घेतला नाही, तर 1 ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी बंदचा इशाराही केंद्र सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांच्या ‘रेल रोको’मुळे रेल्वेचं वेळापत्रक गडगडलं!

पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी ‘रेल रोको’आंदोलन पुकारल्याने रेल्वेचं वेळापत्रक गडगडल्याचं बघायला मिळतंय. आंदोलनादरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून रेल्वे प्रशासनाने 14 रेल्वेगाड्या रद्द केल्या. तर पंजाबमध्ये येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या अंबाला, सहारनपूर आणि दिल्ली रेल्वेस्थानकावर थांबविण्यात येणार असल्याचं म्हटलंय.

दरम्यान केंद्र सरकार आमचं मत जाणून घेण्यास तयार नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवणार असून त्याची तीव्रता वाढवण्याचा पवित्रा पंजाबच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे बाजार समित्या नष्ट होणार असून किमान आधारभूत किंमत अर्थात MSP मिळणार नाही असंही पंजाबच्या शेतकऱ्यांचं मत आहे.
(Panjab farmer rail roko protest against farm bill)

संबंधित बातम्या : 

Special Report | नव्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना फायदा की तोटा?   

MSP साठी सरकार कटिबद्ध, पण MSP कधीही कायद्याचा भाग नव्हता, आजही नाही : कृषीमंत्री तोमर 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *