AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MSP साठी सरकार कटिबद्ध, पण MSP कधीही कायद्याचा भाग नव्हता, आजही नाही : कृषीमंत्री तोमर

शेतीमालास MSP (Minimum Support Price) देण्यास सरकार कटिबद्ध आहे. पण एमएसपी यापूर्वी कधीही कायद्याचा भाग नव्हता,असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले.

MSP साठी सरकार कटिबद्ध, पण MSP कधीही कायद्याचा भाग नव्हता, आजही नाही : कृषीमंत्री तोमर
| Updated on: Sep 24, 2020 | 2:50 PM
Share

नवी दिल्ली : “शेतीमालास किमान आधाभूत किंमत अर्थात MSP (Minimum Support Price) देण्यास सरकार कटिबद्ध आहे. पण एमएसपी यापूर्वी कधीही कायद्याचा भाग नव्हता आणि तो आजही नाही”, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर ( Union Minister of Agriculture and Farmers Welfare Narendra Singh Tomar) म्हणाले.  कृषीमंत्र्यांचं हे विधान म्हणजे विरोधकांची मागणी मान्य होणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत आहेत.  सत्तेत असताना विरोधकांनी एमएसपीवर कायदा का बनवला नाही?, असा सवाल तोमर यांनी विरोधकांना विचारला. (Agriculture minister Narendra Singh Tomar on MSP)

इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर बोलत होते. ते म्हणाले की,”सरकार शेतीमालाला एमएसपी (किमान आधारभूत किंमत) देण्यास कटिबद्ध आहे. परंतु एमएसपी कधीही कायद्याचा भाग नव्हता किंवा तो आजही नाही”

विरोधकांनी सत्तेत असताना कायदा का केला नाही?

किमान आधाभूत किमतीचा कायद्यात समावेश करा अशी विरोधकांची मागणी आहे. यावरुनही नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी विरोधकांची मागणी मान्य नसल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले. “विरोधकांनी आतापर्यंत कित्येक वर्षे सत्ता उपभोगली आहे. एमएसपीबाबत कायद्याची इतकीच गरज वाटत आहे, तर त्यांनी याआधीच कायदा का केला नाही?” असा सवाल तोमर यांनी विरोधकांना विचारला.

दरम्यान केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना (farm bills) शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय. हरियाणा, पंजाब यासारख्या राज्यांतून सरकारविरोधी मोर्चे काढून शेतकरी आपला रोष व्यक्त करताना दिसत आहेत. तर प्रस्तावित कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे भले होईल असा आभास निर्माण केला जात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. इतकंच नाही तर या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप विरोधकांचा आहे. (Agriculture minister Narendra Singh Tomar on MSP)

संबधित बातम्या :  

कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी 

कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच   

रद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस   

कृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.