Farmer Loan Waiver: कर्जमाफीची तारीख जवळ… कशी कराल KYC? जाणून घ्या A टू Z माहिती
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली. जून महिन्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. कशी कराल ही केवायसी, जाणून घ्या A टू Z माहिती...

Farmer Loan Waiver Scheme KYC: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली होती. शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. दोन लाखांच्या वर कर्ज असेल तर अधिकची रक्कम भरून दोन लाखांच्या कर्जमाफीचा फायदा घेता येऊ शकतो. पण कर्जमाफीसाठी सर्वात अगोदर केवायसी करणे आवश्यक आहे. कशी कराल ही केवायसी?
शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी काय करावे लागणार?
भविष्यातील कृषी संबंधित सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. Agristack App Registration प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यांना पीएम किसान योजनेपासून इतर योजनांचा लाभ मिळेल. अनेक जिल्ह्यात त्यासाठी शिबिर आणि नोंदणी सुद्धा सुरू आहे. शेतकऱ्यांची अचूक माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी या ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर नोंदणी केलेली नाही. त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर विहित पद्धतीने नोंदणी करावी लागेल. यामध्ये शेतकर्यांना त्यांचे नाव, शेतजमीन, प्रकार याची माहिती द्यावी लागेल. पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेचा लाभही शेतकर्यांना मिळेल.पण अगोदर ही डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस जतन करण्यात येत आहे. या ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. अनेक शेतकऱ्यांनी अजून नोंदणी न केल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अवगड होईल.
आधार पडताळणी अगोदर करा
शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन, CSC सेंटरवर जाऊन आधार प्रमाणीकरण केवायसी करणे गरजेचे आहे. आधार कार्ड प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, आधार कार्ड सोबत न्यावे. मोबाईल क्रमांकही नोंदवावा. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे घेऊन अथवा ओटीपी द्वारे आधार पडताळा केला जाईल. त्याचा फायदा कर्जमाफीसाठी होईल.
शेतकर्यांना 50 हजार रुपयांचा बोनस
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एक बोनस दिला आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. पीक कर्ज दिलेल्या सर्व बँकांतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. शेतकर्यांना याचा मोठा फायदा होईल.