AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती करा, मृदा दिनाच्या पूर्वसंध्येला कृषिमंत्र्यांचं आवाहन

माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती करा, मृदा दिनाच्या पूर्वसंध्येला कृषिमंत्र्यांचं आवाहन
agricultural minister dada bhuse
| Updated on: Dec 04, 2020 | 8:28 PM
Share

मुंबई : ‘जागतिक मृदा दिवस’ 5 डिसेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत जमीन आरोग्य पत्रिकेचे वाचन करुन शेतकऱ्यांना खतांच्या शिफारशीबाबत, जमिनीच्या आरोग्याबाबत खतांच्या संतुलित वापराबाबत कृषी विद्यापीठांच्या तज्ञांमार्फत मार्गदर्शन करावे. माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. (Raise awareness among farmers about soil testing Appeal Agriculture minister Dadaji Bhuse)

जमिनीचे आरोग्य बिघडण्याचा धोका लक्षात आल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या 68 व्या सर्वसाधारण सभेत 2015 आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. जमिनीच्या आरोग्याबाबत संपूर्ण जगात याबाबतचा संदेश पोहचविणे तसेच शेतकरी व समाजात शेतजमिनीच्या आरोग्याबाबत जाणीवजागृती करून देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे आणि त्या वर्षापासून 5 डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका ही योजना राज्यात कार्यान्वित झालेली आहे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतजमिनीच्या रासायनिक गुणधर्माची स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. त्यानुसार पिकांना खत मात्रांच्या शिफारशी उपलब्ध होणार आहेत. यामुळे खताच्या संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन मिळणार असून जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होणार आहे.

यावर्षीच्या जागतिक मृदादिनी राज्यभर जिल्हा, तालुका व गावपातळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशानुसार खरीप व रबी हंगामातील प्रमुख पिकांना आवश्यक खत मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) शिफारशीचे फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात प्रामुख्याने जमीन आरोग्य पत्रिकेचे वाचन करुन शेतकऱ्यांना खतांच्या शिफारशीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

(Raise awareness among farmers about soil testing Appeal Agriculture minister Dadaji Bhuse)

संबंधित बातमी

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हॉटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर : कृषिमंत्री दादाजी भुसे

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.