नांदेड जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनची विक्रमी लागवड

राजीव गिरी

राजीव गिरी | Edited By: अजय देशपांडे

Updated on: Jan 30, 2022 | 8:21 PM

नांदेडमध्ये उन्हाळी हंगामातील सोयाबीनची फलधारणा झाली आहे. त्यामुळे  बेमोसमी सोयाबीन चांगलंच बहरलय. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक हातचे गेले होते. अतिवृष्टीचा मोठा फटका हा सोयाबीनला बसल्याचे पहायला मिळाले.

नांदेड जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनची विक्रमी लागवड
उन्हाळी सोयाबीन

नांदेड : नांदेडमध्ये उन्हाळी हंगामातील (summer season) सोयाबीनची (Soybean) फलधारणा झाली आहे. त्यामुळे  बेमोसमी सोयाबीन चांगलंच बहरलय. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक हातचे गेले होते. अतिवृष्टीचा मोठा फटका हा सोयाबीनला बसल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट झाली. उत्पादन घटल्यामुळे बाजारात सोयाबीनला यंदा विक्रमी भाव मिळाला. यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी (Farmers)मोठ्याप्रमाणात उन्हाळी सोयाबीन पेरले आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन पाण्यात भीजल्याने खराब झाले. तसेच उत्पादनात देखील घट झाली. मात्र उत्पादन घटल्याने सोयाबीनला चांगला भाव मिळाला. उन्हाळी सोयाबीनला देखील चांगला भाव मिळेल या अशेने नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात उन्हाळी सोयाबीन पेरले आहे.

सोयाबीनचा बियाण्यांसाठी वापर

एकट्या नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे.  विशेष म्हणजे उन्हाळ्यात सोयाबीन पिकांचे उत्पादन चांगले होईल की नाही याची भीती होती. मात्र आता सोयाबीनच्या पिकाने शेंगा धरण्यास सुरुवात केली असून, पीक फलधारनेने लगडून गेलय. गेल्या काही वर्षांत सोयाबीनच्या बियाण्यात मोठी भाव वाढ झाली असून, फसवणूकीचे प्रकार देखील वाढलेत. त्यातून उन्हाळी सोयाबीन पेरून त्यातून बियाणे मिळवण्याकडे शेतकऱ्यांचा भर असल्याचे दिसतंय. पावसाळी हंगामापेक्षाही उन्हाळी सोयाबीन दाणेदार आणि परिपक्व असल्याने त्याचा बियाणे म्हणून वापर वाढला आहे.

अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान 

यंदा वर्षभर पावसाने पाठ सोडली नाही. ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस पडल्याने हातचे पीक गेले. पावसात भीजल्याने सोयाबीन खराब झाले. अतिवृष्टीमुळे सोयबीनच्या उत्पादनात घट झाल्याने यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळाला. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनला देखील असाच भाव मिळेल अशी अशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे नांदडे जिल्ह्यात तब्बल सहा हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. उन्हाळी  सोयाबीन चांगलेच बहरले असून, त्याला शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या

Organic Farming: सेंद्रीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज : भगतसिंग कोश्यारी

ऊस बिलातून वीजबिल वसुलीचे पुन्हा संकेत, शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, काय म्हणाले सहकार मंत्री ?

Cotton : शेतकऱ्यांना मिळाला पांढऱ्या सोन्याचा आधार, आता केवळ फरदड शिल्लक, जाणून घ्या कसा राहिला हंगाम!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI