AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संशोधन समितीच शोधणार आता फळगळतीवर उपाय, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान

ऐन तोडणीच्या दरम्यानच संत्रा फळगळतीचा धोका हा ठरलेलाच आहे. यंदाही हे संकट ओढावल्याने बागाय़त शेतकऱ्यांनी संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवली होती. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. फळगळतीकडे ना संशोधन समितीकडून लक्ष दिले जात नाही. शिवाय कृषी विद्यापीठाकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात नाही.

संशोधन समितीच शोधणार आता फळगळतीवर उपाय, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 7:05 PM
Share

अमरावती : ऐन तोडणीच्या दरम्यानच संत्रा फळगळतीचा ( Fruit leakage) धोका हा ठरलेलाच आहे. यंदाही हे संकट ओढावल्याने (horticulture farmer) बागाय़त शेतकऱ्यांनी संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवली होती. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. फळगळतीकडे ना संशोधन समितीकडून लक्ष दिले जात नाही. शिवाय कृषी विद्यापीठाकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे या फळगळतीवर उपाययोजना करण्यात यावी यासंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर या प्रश्‍नावर राज्यस्तरीय समितीची गठण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फळबागाचे अधिकचे क्षेत्र विदर्भात

विदर्भात फळबागाचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. तर अमरावती जिल्ह्यात 1 लाख हेक्टरावर संत्रा फळबाग आहे. परंतु दर्जेदार रोपांचा अभाव, डोळा बांधणी कामी रोगग्रस्त खुंटांचा वापर तसेच एकाच वाणावर असलेली अवलंबिता या कारणामुळे नागपुरी संत्रा उत्पादकतेत पिछाडला आहे. त्यातच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावदेखील नजीकच्या काळात वाढीस लागल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. फळगळीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्याच्या परिणामी यंदाच्या हंगामात विदर्भाचे पाच लाख टनाचे उत्पादन दोन ते अडीच लाखापर्यंत खाली आले आहे.

फळबागांची तोडणी

फळगळ नियंत्रणात येणारच नाही या भावनेतून शेतकऱ्यांनी अखेर संत्रा बागा काढून टाकण्यावर भर दिला आहे. नांदगाव खंडेश्‍वर, वरुड, मोर्शी भागात हजारो संत्रा झाडे शेतकऱ्यांनी काढून टाकली. त्यासोबतच केंद्रीय लिंबूवर्गीय संस्था तसेच कृषी विद्यापीठाविरोधात संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील याचे लोण पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी संत्रा बागा काढून पुन्हा पारंपरिक पिकांकडे वळणार असल्याची भीतीदेखील वर्तविली जात आहे.

आंबिया बहर म्हणजे नेमके काय?

आंबिया बहर हे नोव्हेंदर-डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जाणारे फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे.

धोका फळमाशीचा

फळमाशी ही झाडाच्या खोडात अंडी घालते. अंड्यातील अळ्या ह्या फळाचा गरच खातात. एवढेच नाही तर माशीने तयार केलेल्या छिद्रातून सुक्ष्म किटक हे फळात जातात व फळ हे सडायला लागते. सडलेले फळ हे खाली पडते.

कसे करायचे व्यवस्थापन ?

व्यवस्थापन करण्यापूर्वी जमिनीवर पडलेली फळे ही लागलीच नष्ट करावीत. जेणे करुन इतर झाडांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. फळमाशी ही झाडाखाली जमिनीत कोषावस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीची नांगरण करुन कोष नष्ट करावे लागणार आहेत. या करिता 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी लागणीर आहे.

संबंधित बातम्या :

थकीत ‘एफआरपी’ वरुन लातूरात आता भाजप-काँग्रेस आमने-सामने

खरिपातील तूर फुलोऱ्यात, काय आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आवाहन ?

मेहनतीचे फळ : देशात 1.25 लाख मेट्रीक टन मधाचे उत्पादन, 60 हजार मेट्रीक टनाची निर्यात

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.