बेदाणा वॉशिंगचं रसायनमिश्रीत पाणी द्राक्षबागेत, कवठेएकंदच्या शेतकऱ्याचं 50 लाखांचं नुकसान
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे कोल्ड स्टोरेजचे बेदाणा वॉशिंगचे केमिकल मिश्रीत पाणी सात एकर द्राक्षबागेत शिरले आहे. (Tasgaon Grapes Loss)

सांगली: तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे कोल्ड स्टोरेजचे बेदाणा वॉशिंगचे केमिकल मिश्रीत पाणी सात एकर द्राक्षबागेत शिरले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या 7 एकर द्राक्षबागेला झळ बसली आहे. द्राक्षांची झाडे व झाडाच्या मुळ्या जळून जात असल्याने त्यांचे 50 लाखांचे नुकसान झाले आहे, असा दावा नुकसानग्रस्त शेतकरी विजय पैलवान आणि बापूसो पैलवान यांनी केलाय. या नुकसानीबाबत विजय बापूसो पैलवान व बापूसो पांडुरंग पैलवान या कवठेएकंदच्या शेतकऱ्यांनी प्रदूषण मंडळ सांगली व जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे तक्रार केली आहे. द्राक्ष बागेच्या नुकसानाची भरपाई मिळावी आणि प्रदूषण केल्याबद्दल कोल्ड स्टोरेजवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ( Sangli Tasgaon Kavathekand grapes loss due to cold storage water)
द्राक्षबागेचे नुकसान
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद मधील विजय पैलवान आणि बापूसो पैलवान यांच्या शेतीजवळ गुलशन कुमार जगदीश अग्रवाल यांचे कोल्ड स्टोरेज आहे. 2001 पासून गुलशन कुमार जगदीश अग्रवाल यांचे जय शितला कोल्ड स्टोरेज सुरु आहे. तर, 2010 पासून त्यांनी कोल्ड स्टोरेज परिसरात बेदाणा वॉशिंग सुरू केले आहे. यासाठी त्यांनी 15 फूट खोलीचा खड्डा खणला आहे, अशी माहिती पैलवान यांनी दिली.
जय शितला कोल्ड स्टोरेजकडून बेदाणा वॉशिंग करण्यासाठी त्यात केमिकल कार्बोनेट सोडा,डीपिंग ऑईल, निरमा, व भट्टी लावण्यासाठी सल्फर गंधक वापरतात.मात्र, प्रक्रिया करून खराब झालेल्या केमिकल व पाणी यांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. ते जमिनीत सोडले जात आहे. मात्र, 2 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीपासून वॉशिंगच्या खड्ड्यातील पाणी आमच्या 7 एकर द्राक्षबागेच्या क्षेत्रावर आले आहे. त्यामुळे द्राक्षबागांच्या मुळ्या जळून जात झाडे मरू लागली आहेत. परिणामी द्राक्षबागांना माल कमी आल्याने माझे 50 लाखांचे नुकसान झाले आहे, असं पैलवान यांनी सांगितले.
सांगलीत हळद सौद्यांना सुरुवात
हळदीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. सांगली जिल्ह्यात दरवर्षी जानेवारी महिन्यात हळदीच्या सौद्यांना सुरुवात होते. यावर्षीच्या हळदीच्या सौद्यांना मुहूर्तावर सुरुवात झाली झाली आहे. सेलम हळदीला पहिल्याच बोलीला 7501 रुपयांचा दर मिळाला आहे, अशी माहिती सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली. सांगलीतील हळदीची बाजारपेठ देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. 2021 मधील हळद सौद्याला सांगलीत मुहूर्तावर सुरुवात झालीय.सेलम हळदीला मिळाला पहिल्याच बोलीला 7501 रुपये दर मिळाला आहे.
Budget 2021 : …तर सोनं-चांदी आणखी स्वस्त होणार#Budget2021 #GoldPriceTodayhttps://t.co/xU9yTE0bDv
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
संबंधित बातम्या:
पाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा
सांगलीत हळद सौद्यांना सुरुवात, सेलम हळदीवर पहिल्याच बोलीला मिळाले….
( Sangli Tasgaon Kavathekand grapes loss due to cold storage water)