AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीक विम्याचा प्रश्न हायकोर्टात, शिवसेना आमदाराकडून न्यायालयीन लढाई सुरु

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी पीक विमा मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांना पीक विमा कंपन्या दाद देत नसल्यानं हे प्रकरण हायकोर्टात पोहोचलं आहे.

पीक विम्याचा प्रश्न हायकोर्टात, शिवसेना आमदाराकडून न्यायालयीन लढाई सुरु
सुहास कांदे, आमदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 6:01 PM
Share

रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मनमाड (नाशिक) : शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न राज्यात गंभीर बनत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी पीक विमा मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांना पीक विमा कंपन्या दाद देत नसल्यानं हे प्रकरण हायकोर्टात पोहोचलं आहे.शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पीक विमा कंपनी विरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे.

विमा कंपन्यांसह केंद्र व राज्याला नोटीस

शेतकऱ्यांचं पीक विमा प्रकरण आता मुंबई हायकोर्टात पोहोचलं आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं होतं तरी देखील पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही, असा आरोप करत नांदगाव-मनमाडचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलाय. सुहास कांदे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. हायकोर्टानं विमा कंपनी सोबत केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

30 ऑगस्टला सुनावणी

30 ऑगस्ट रोजी या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी आमदारानं याचिका दाखल करण्याची पहिली वेळ

पीक विम्याचा प्रश्न हायकोर्टात पोहोचला असून गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे 100 टक्के नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. पीक विम्या बाबत सत्ताधारी आमदाराने कोर्टात याचिका दाखल करण्याची ही पहिली घटना मानली जात आहे.

नांदेडमध्येही शेतकऱ्यांचा रास्तारोको

पीक विम्याच्या मागणीसाठी हदगाव शहरात आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत जेल भरो आंदोलन केले. हजारो शेतकऱ्यांनी सोलापूर- नागपूर हायवेवर रास्ता रोको करत हे आंदोलन केलेय. गतवर्षीच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे जबर नुकसान झाले मात्र पीकविमा मिळालाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलय.

हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याने हायवे वरची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती, तर जेलभरो आंदोलनामुळे पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हक्काच्या पीक विम्याच्या मागणीसाठी यापुढेही तीव्र संघर्ष करण्याचा इशारा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिलाय.

इतर बातम्या:

Weather Update: राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा नवा अंदाज

परभणीच्या शेतकऱ्यांची पुण्यात धडक, पीक विमा प्रश्नी आक्रमक, 3 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी

Shivsena MLA Suhas Kande File PIL in Bombay High Court for Crop insurance issue of Farmers notice sent to Centre and State

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.