Soil Testing : 5 ग्रॅम माती घ्या अन् दीड मिनिटांमध्ये स्वत:च माती परीक्षण करा ! वाचा सविस्तर

उत्पादन वाढीसाठी आणि शेत जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी माती परीक्षण ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. माती परीक्षणासाठी 1 किलो माती परीक्षणाच्या लॅबमध्ये घेऊन जाण्याचा आटापिटा आणि मग काही दिवसांनी त्याचा रिपोर्ट अशी संपूर्ण प्रक्रिया होती. पण कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) माती परीक्षण वेगाने व अचूक करण्यासाठी पोर्टेबल किट विकसित केले आहे.

Soil Testing : 5 ग्रॅम माती घ्या अन् दीड मिनिटांमध्ये स्वत:च माती परीक्षण करा ! वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 8:07 AM

मुंबई : उत्पादन वाढीसाठी आणि शेत जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी (Soil Test) माती परीक्षण ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. माती परीक्षणासाठी 1 किलो माती परीक्षणाच्या लॅबमध्ये घेऊन जाण्याचा आटापिटा आणि मग काही दिवसांनी त्याचा रिपोर्ट अशी संपूर्ण प्रक्रिया होती. पण कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (IIT) माती परीक्षण वेगाने व अचूक करण्यासाठी पोर्टेबल किट विकसित केले आहे. पाच ग्रॅम मातीचा नमुना घेऊन मोबाईलच्या मदतीने केवळ 90 सेकंदांमध्ये मातीचे आरोग्य जाणून घेता येणार आहे.

वेळीची बचत अन् अचूक परीक्षण

काळाच्या ओघात सामान्य शेतकरीही माती परीक्षणावर भर देत आहे. माती परीक्षणासाठी साधारणपणे 1 किलो माती नमुना योगशाळेमध्ये नेऊन द्यावा लागतो. त्यात अपेक्षित घटकानुसार त्याचे निष्कर्ष मिळण्यासाठी दोन ते सात दिवस लागू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च, वेळ आणि पैसा खर्च होतो. या त्रासामुळे बहुसंख्य शेतकरी माती परीक्षणापासून करण्यापासून वंचित राहतात. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी कानपूर येथील संस्थेच्या रसायन अभियांत्रिकी विभागातील जयंत कुमार सिंग, पल्लव प्रिन्स, अशर अहमद, यशस्वी खेमानी आणि महम्मद आमीर खान यांनी हे उपकरण बनवले आहे.

असे होते परीक्षण

परीक्षणाचा निष्कर्ष त्वरित मोबाईलवर प्राप्त होण्यासाठी ‘भू परीक्षक’ हे मोबाईल ॲप तयार केले. (Google Play Store) या तंत्रज्ञानाचे हस्तांतर संस्थेने ॲग्रोएनएक्सटी सर्व्हिसेस या कंपनीला केले आहे. केवळ पाच ग्रॅम माती नमुना 5 सेंमी लांबीच्या परीक्षानळीसारख्या दिसणाऱ्या उपकरणामध्ये टाकायचा. त्यानंतर हे उपकरण ब्ल्यूटूथद्वारे मोबाईलशी जोडायचे. जर ब्ल्यूटूथ चालू असेल, तर ते आपोआप जोडले जाते. ही प्रक्रिया 90 सेकंदांमध्ये पार पडते. त्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर भू-परीक्षक या विशेष तयार केलेल्या ॲपमध्ये मातीच्या आरोग्याचा अहवाल एकमेव अशा आयडी क्रमांकासह त्वरित उपलब्ध होतो.

या बाबींचा होतो निष्कर्ष

या उपकरणामुळे मातीतील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब यांसह सहा घटकांचे प्रमाण समजू शकते. पिकाचा उल्लेख केलेला असल्यास त्या पिकासाठी शिफारशीत खतमात्रा आणि परीक्षणानुसार करायचे बदल यानुसार आपल्या शेतासाठीच्या खत शिफारशी सुचविल्या जातात. त्यानुसार पिकांचे खत व्यवस्थापन केल्यास पिकाचे उत्पादन वाढीसाठी फायदा होऊ शकतो. अद्यापही हे अॅप बाजारात आले नसले तरी यशस्वी झाले असून लवकरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना वापरता येणार आहे.

संबंधित बातम्या :

Agrovision | केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात, खासगी गुंतवणूक वाढविणे आव्हानात्मक; शेतीतील असंतुलन कसे होणार दूर?

शेतकऱ्यांनो सावधान अन्यथा पिकांचे नुकसान अन् आर्थिक फटकाही, किटकनाशक घेताना काय काळजी घ्यावी?

Natural Farming : आता सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी कृषी विद्यापीठांचाही सहभाग, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.