AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना महामारीत शेतीनं तारलं, माढयाच्या युवा शेतकऱ्यानं लाखो रुपयांचा आंबा थेट युरोपला पाठवला

महेश मुकणे या तरुणाच्या शेतातील केशर आंबा थेट युरोपला पाठवला आहे. Mahesh Mukane Kesar Mango Europe

कोरोना महामारीत शेतीनं तारलं, माढयाच्या युवा शेतकऱ्यानं लाखो रुपयांचा आंबा थेट युरोपला पाठवला
महेश मुकणे, युवा शेतकरी
| Updated on: May 10, 2021 | 12:17 PM
Share

सोलापूर: सध्या कोरोना महामारीच्या काळात इतर व्यवसाय थांबलेले आहेत. शेती व्यवसायाला मात्र, या काळातही अडचण नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. पारंपारिक शेतीला पुन्हा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर सोन्याहून पिवळे असेच म्हणावे लागेल. सोलापुरातील माढा तालुक्यातील निमगाव गावच्या युवा शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादित केलेला केशर आंबा थेट युरोपला पाठवला आहे.  शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या गुणवत्तापूर्ण मालाला परदेशात पोहोचायला काहीच वेळ लागत नाही हे यानिमित्तानं समोर आलंय. महेश मदन मुकणे या तरुणाने सेंद्रीय पद्धतीनं केशर आंबा लागवड केली. महेश मुकणेनं यानं भाऊ अमोल मुकणेच्या मदतीवर उत्पादित केलेला केशर आंबा युरोपला जाऊन पोहचलाय. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात देखील महेश योग्य नियोजनाच्या जोरावर लखपती झालाय. (Solapur Nimgaon youth farmer Mahesh Mukane export Kesar Mango to Europe earn Lakh rupees)

युरोपच्या लोकांना केशर आंबा आवडला

रसदार  व चवदार अशा या आंब्याची चव  युरोपकरांना  चांगलीच आवडलीय, तसे फोन देखील महेश मुकणे यांना आले आहेत. महेश मुकणे यांच्या बागेतील 1 टन आंबा युरोपला नुकताच रवाना झाला आहे. लवकरच आंब्याचा दुसरा ट्रक देखील पाठवला जाणार आहे. महेश यांच्याकडे आंब्यासाठी बाजारपेठेतून मागणी नोंदवण्यात आलीय.

पारंपारिक शेती सोडून आंब्याची लागवड

सीना नदीच्या काठी बहुतांश  शेतकरी ऊस शेती करतात.मात्र, महेश मुकणे यानं चार एकर क्षेत्रात केशर आंब्यांची बाग विकसित केलीय.निसर्गाचा लहरीपणा ध्यानी घेत महेशने  शेतातील पारंपारिक पिके घेण्याचे बंद केले.4 एकर क्षेत्रात केशर आंब्यांची 1700 झाडे लावलीत. यापैकी यंदा 100 झाडाचे उत्पन्न हाती आले असुन यातुन त्यांना  4 ते 5 लाखाच उत्पन्न हाती मिळणार आहे. युरोपला  गेलेला 1  टन आंबा प्रति किलो 160 रुपये दराने  विकला गेलाय.तर महेश यांना बंधु अमोल व अमित यांचे पाठबळ मिळत आले आहे.

माढ्यासह परिसरातील गावातील नागरिकांना देखील महेश मुकणे आंबा घरपोहोच देतात. मागील 8  दिवसात  500 ते  700 किलोच्या आंब्याची  विक्री झालीय.तर आणखी चार टन आंब्याचे उत्पन्न निघण्याचा विश्वास  महेशला वाटतो  आहे.

नोकरीच्या मागं न लागता शेतीमध्ये नवे प्रयोग

बीएस्सी अॅग्रीचे शिक्षण घेतलेला महेशने नोकरीच्या वाटा शोधत न बसता केशर आंब्याची लागवड केली आणि तो प्रयोग यशस्वी देखील झालाय. योग्य नियोजनामुळे महेशचा आंबा विदेशात जाऊन पोहचलाय. केशर आंबा लागवडीचा प्रयोग महेशला  फायदेशीर अन् लखपती बनवणारा ठरलाय. प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची परिसरात ओळख बनली गेलीय.

संबंधित बातम्या:

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो मोठा निर्णय

द्राक्ष पंढरीतील शेतकरी आक्रमक,निर्यातीवरील सबसिडी सुरु करण्याची मागणी

(Solapur Nimgaon youth farmer Mahesh Mukane export Kesar Mango to Europe earn Lakh rupees)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.