डिझेल टाका, शेतीची मशागत करा, सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा

मुन्ना साठे या तरुणानं अल्पभूधारक शेतकऱ्यांसांठी मोफत ट्रॅक्टर सेवा उपलब्ध करुन दिलीय. Vadshinge Village Munna Sathe Free Tractor Service

डिझेल टाका, शेतीची मशागत करा, सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा
मोफत ट्रॅक्टर सेवा


सोलापूर: वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांसमोर शेतीच्या मशागतीच्या कामं करणं अवघड होऊन बसलं आहे. शेतकऱ्यांना मशागतीच्या कामासाठी इतरांपुढे हात पसरावे लागतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर तर शेतीच्या कामांचा मोठा प्रश्न निर्माण होतो. माढा तालुक्यातील वडशिंगे येथील मुन्ना साठे या तरुणानं मोठा निर्णय घेतला आहे. साठे यांच्या मार्फत अल्पभूधारक शेतकर्यांच्या शेतीची मोफत मशागत करून दिली जाणार आहे. (Solapur Vadshinge Village Munna Sathe gave free tractor service for low land holding farmers)

शेतीची सर्व कामं केली जाणार

वडशिंगे गावातील तरूण शेतकरी मुन्ना साठे यांनी यासाठी मोफत ट्रॅक्टर व शेती अवजारे गावातील शेतकर्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. शेतीमालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अशातच वाढत्या इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी आणखी अडचणीत आले आहेत.गरीब व अल्पभूधारक शेतकर्यांच्या शेतीची मोफत मशागत करून देण्यासाठी मुन्ना साठे या तरूण शेतकऱ्यानं ट्रॅक्टरसह मशागतीसाठी लागणारी अवजारे उपलब्ध करुन दिली आहेत.

शिवजयंतीनिमित्त उपक्रमाला सुरुवात

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. महाराजांच्या जयंतीनिमित्त वडशिंगे गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीची कामं मोफत करुन देण्याचा निर्णय घेतल्याचं वडशिंगे गावातील तरुण मुन्ना साठे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या रानात मशागत करण्यासाठी नांगरणे, रोटर करणं यासाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करुन देण्यात आलाय. शेतकऱ्यांना यामध्ये फक्त डिझेल घालावे लागणार आहे, असं मुन्ना साठे यांनी सांगितलं.

वडशिंगे गावातील 200 ते 300 शेतकऱ्यांना फायदा

या उपक्रमुळे वडशिंगे गावातील 200 ते 300 अल्पभूधारक शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे.शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवजयंतीच्या दिवशी मोफत मशागतीचा प्रारंभ केला. वडशिंगे गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एकरी 2500 रुपये नांगरणीसाठी खर्च करण्यापेक्षा फक्त डिझेल टाकून मशागतीची काम करणं फायदेशीर असल्याचं शेतकरी नागनाथ महादेव मुलाणी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणेकर अनिकेत साठे लष्करात लेफ्टनंटपदी, वाचा प्रेरणादायी कहाणी

70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार

(Solapur Vadshinge Village Munna Sathe gave free tractor service for low land holding farmers)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI