Summer Season: उन्हाळी हंगामाचे बदलते चित्र ‘हे’ आहे मुग लागवडीचे योग्य तंत्र

पीक पध्दती ही बदलत्या वातावरणानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यंदा उन्हाळी हंगामात मोठा बदल दिसत आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ तर झालीच आहे पण मूगाची लागवडीचा प्रयोगही शेतकरी करीत आहेत. हे सर्व काही शेतकऱ्यांसाठी नवीन असले तरी मूग लागवडीचे योग्य तंत्र याची माहिती असणे गरजेचे आहे.

Summer Season: उन्हाळी हंगामाचे बदलते चित्र 'हे' आहे मुग लागवडीचे योग्य तंत्र
संग्रहीत छायाचित्र

पुणे : पीक पध्दती ही बदलत्या वातावरणानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यंदा उन्हाळी हंगामात मोठा बदल दिसत आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. यंदा (Summer season) उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ तर झालीच आहे पण ( mug sowing) मुगाची लागवडीचा प्रयोगही शेतकरी करीत आहेत. हे सर्व काही शेतकऱ्यांसाठी नवीन असले तरी मुग लागवडीचे  (technical method) योग्य तंत्र याची माहिती असणे गरजेचे आहे. उन्हाळी मुग लागवड करताना महत्वाचे आहे ते वाण. मुगाचे वैभव आणि बी.पी.एम. आर. 145 या जातीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असून यामधून उत्पादनही अधिकेचे मिळते. याची लागवड करताना दोन ओळीत 30 सेंमी आणि 2 रोपांत 10 सेंमी अंतर ठेवून पाभरीने मूग पेरावा. एकरी ते 6 किलो बियाणे लागते.

ही आहे योग्य पध्दत

मुग पिकासाठी जमीन ही मध्यम ते भारी असावी लागते. या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा असावा. दोन ओळींत 30 सेंमी आणि 2 रोपात 10 सेंमी अंतर ठेवून पाभरीने मूग पेरावा. याकरिता एकरी 5 ते 6 किलो बियाणे लागते. पेरणी केल्यावर पाणी व्यवस्थित देण्यासाठी 4 ते 5 मीटर रुंदीचे सारे ओढून घ्यावेत लागणार आहेत. तर मूळकुजव्या रोगाचे नियंत्रणासाठी प्रति किलो बियाण्याला 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा आधिक 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. मूग पिकासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धन वापरावे. हायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियमुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

या जातीच्या वाणाची लागवड करावी

मुगामध्ये विविध जाती उपलब्ध आहेत. यामध्ये वैभव आणि बी.पी.एम.आर. 145 या जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. भुरी रोगाला प्रतिकारक्षम आहेत. कोपरगाव – 1 या पारंपरिक जातीपेक्षा अधिक उत्पादन देणारे आहेत. कोपरगाव – 1 ही जात जुनी असून, त्यावर भुरीचा मोठा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे याची लागवड टाळावी. लागवडीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत मिसळावे. या खतांमुळे हवेतील ओलावा खेचून मुळांभोवती गारवा निर्माण होतो. पीक वाढीसाठी 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. शक्यतो रासायनिक खते चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाणा लगत पेरन द्यावीत.

अशी घ्या योग्य काळजी

पेरणीपासूनच पीक तणविरहित ठेवल्याने पिकाची वाढ जोमात होते. पीक 20 ते 22 दिवसांचे असताना पाहिली आणि 30 – 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी लागणार आहे. कोळपणी नंतर दोन रोपातील तण काढाण्यासाठी लगेच खुरपणी करावी. पीक 30 – 45 दिवस तण विरहित ठेवणे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक असते. पिकास फुले येत असताना आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा परिस्थितीत पिकास पाणी देणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

Milk Price : काय सांगता ? दूधाचे दर वाढणार, काय आहेत कारणे अन् तज्ञांचे मत..!

Kharif Onion : अतिवृष्टीचा मारा, करप्याचा प्रादुर्भावानंतरही ‘तो’ मुख्य बाजारपेठेत दाखल, नगदी पिकातून शेतकऱ्यांना दिलासा

Latur Market : साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारात, दर स्थिर असतानाही आवक वाढलेलीच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI