पुन्हा घटले सोयाबीनचे दर, शेतकऱ्यांची धाकधुक कायम

सलग दोन दिवस सोयाबीनच्या (Soyabean Rate) दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलसा मिळाला होता. मात्र, आठवड्याची सुरवात आणि शेवटही दर घटूनच झाली आहे. (Latur) त्यामुळे दिलासा मिळालेला शेतकरी सोमवारी सोयबीन बाजारात आणतो का दर वाढीची प्रतिक्षा करतो हे पहावे लागणार आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी क्विटलमागे 700 रुपयांची घसरण झाली आहे.

पुन्हा घटले सोयाबीनचे दर, शेतकऱ्यांची धाकधुक कायम
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती

लातूर : सलग दोन दिवस सोयाबीनच्या (Soyabean Rate) दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलसा मिळाला होता. मात्र, आठवड्याची सुरवात आणि शेवटही दर घटूनच झाली आहे. (Latur) त्यामुळे दिलासा मिळालेला शेतकरी सोमवारी सोयबीन बाजारात आणतो का दर वाढीची प्रतिक्षा करतो हे पहावे लागणार आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी क्विटलमागे 700 रुपयांची घसरण झाली आहे.

दिवगणिक दर कमी-अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे उडदाचे दरही घटल्याने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. आतापर्यंत उडदाचे दर हे 7000 च्या खाली नव्हते शनिवारी मात्र, 7300 वरील उडीद 6700 वर आला होता.

शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही काही प्रमाणात हे वावरातच आहे. यातच पावसाच्या अवकृपेमुळे होणारे नुकसान हे वेगळेच. उभ्या सोयाबीनला आता कोंब फुटु लागले आहेत. तर बाजारातही योग्य दर मिळत नसल्याने ज्या पिकावर शेतकऱ्याची मदार होती त्याच पिकाचे अधिकचे नुकसान झालेले आहे. उडीद आणि मूगाची काढणी ही पावसाला सुरुवात होण्यापुर्वीच झाली होती. गेल्या पंधरा दिवसापासून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरु झाली होती.

आवक वाढताच दर हे घसरले होते. त्यामुळे आवकही घटलेलीच आहे. शिवाय लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच असल्याने काढणी, मळणी ही कामे रखडल्याने आवक घटली आहे. शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. असे असतानाही दर घटल्याचे पाहवयास मिळाले आहेत. त्याच बरोबर ज्या उडीदाचे दर गेल्या आठ दिवसांपासून स्थिर होते त्याचेही दर आता घसरु लागले आहेत.

शेतकऱ्यांनी काय करावे?

नव्या सोयाबीनची आवक ही सुरु झाली की दरवर्षी दर हे घटतच असतात. यंदा ते अधिक तीव्रतेने जाणवत आहे. कारण हंगामाच्या सुरवातीला 11 हजाराच्या दराची बाऊ झाला होता. तो दर काय नियमित असा नव्हता. शेतकऱ्यांचा उत्साह वाढवा आणि नविन सोयाबीन बाजारात येताच व्यापारी हे मुहुर्त भाव म्हणून हा दर देत असतात. सध्या सोयागेंडची आवक, पावसाने सोयाबीन डागाळले असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई-गडबड न करता सोयाबीनचा साठा करावा आणि योग्य दर मिळताच विक्री करण्याचा सल्ला कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिलेला आहे.

लातूरच्या बाजार समितीमधील दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6440 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6411 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6286 रुपये क्विंटल, जानकी चना 5200 रुपये क्विंटल, विजय चणा 5200, चना मिल 5000, सोयाबीन 7021, चमकी मूग 6791 , मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 6700 एवढा राहिला होता.

उडदाच्या दराच प्रथमच घसरण

खरीप हंगामाचा श्रीगणेशा हा उडीदाच्या आवाकीने झाला होता. तेव्हापासून उडदाला 7000 पेक्षा अधिकचा दर मिळालेला आहे. सोयाबीनचे दर घसरले तरी शेतकऱ्यांना उडदाचा आधार होता. मात्र, शनिवारी उडदाचेही दर 600 रुपयांनी घसरले आहेत. सोयाबीन आणि उडीद हीच खरीपातील मुख्य पिके आहेत. त्यांचेच दर घसरल्याने चिंता व्यक्त होत आहे. (Soyabean prices fall again,
The price of urada in Latur market has also come down)

संबंधित बातम्या :

ई-श्रमिक कार्ड शेतकऱ्यांसाठी की श्रमिकांसाठीच ? जाणून घ्या काय आहेत फायदे

अवकाशातून पडला दगड, मग पंचनामा अन् बारा भानगडी

बळीराजाची फसवणूक, खतांमध्ये भेसळ झाल्याचा संशय, कृषी केंद्राचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI