ई-श्रमिक कार्ड शेतकऱ्यांसाठी की श्रमिकांसाठीच ? जाणून घ्या काय आहेत फायदे

सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ई-लेबर कार्डची प्रक्रीया ही सुरु केलेली आहे. त्यानुसार ई-श्राम पोर्टलवर (E-Shramik Portal) मोठ्या संख्येने कामगार नोंदणी केली जात आहे.

ई-श्रमिक कार्ड शेतकऱ्यांसाठी की श्रमिकांसाठीच ? जाणून घ्या काय आहेत फायदे
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : केंद्र सरकारच्यावतीने (Central Government) शेतकऱ्यांसाठी तसेच इतर घटकासाठी अनेक योजना ह्या राबल्या जातात त्यापैकीच एक ही ई- लेबर कार्डची आहे. सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ई-लेबर कार्डची प्रक्रीया ही सुरु केलेली आहे. त्यानुसार ई-श्राम पोर्टलवर (E-Shramik Portal) मोठ्या संख्येने कामगार नोंदणी केली जात आहे.

ई-श्राम पोर्टलवर 1 कोटीहून अधिक कामगारांनी अतिशय कमी कालावधीत नोंदणी केली आहे. या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिला जात आहे. भविष्यात कामगारांसाठी कोणतीही योजना आली तर माहीती आणि फायदे या माध्यमातून दिले जाणार आहेत. त्यामुळे असंघटीत घटकातील कामगारांना प्रवाहात आणण्यासाठी ही योजना महत्वाची मानली जात आहे.

शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी पात्र आहेत का?

दीर्घकाळातील विमा आणि त्याचे फायदे यामुळेच पोर्टलवरील नोंदणीची संख्या ही झपाट्याने वाढत आहे, पण शेतकरीही या पोर्टलवर नोंदणी करू शकतात का? ते ही ई-श्राम कार्ड बनवू शकतात? तर उत्तर आहे, नाही. ई-श्राम पोर्टलवर केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी नोंदणीसाठी पात्र आहेत. भारत सरकार देशातील कोट्यवधी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करीत आहे. त्यासाठी मोदी सरकारने एक ई-श्राम पोर्टल विकसित केले असून ते त्यांच्या आधार कार्डशी जोडले जाईल. ई-श्राम पोर्टलअंतर्गत नोंदणी पूर्णपणे मोफत आहे.

16 ते 59 वयोगटातील कामगार करू शकतात नोंदणी

ई-श्राम पोर्टलवर नोंदणीसाठी उत्पन्नाचे कोणतेही निकष लावण्यात आलेले नाहीत. केवळ कामगार हा आयकर भरणारा नसावा. 16 ते 59 वयोगटातील कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्राम पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र आहे. नोंदणीसाठी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, आधारशी जोडलेले बँक खाते यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. पोर्टलवर नोंदणी करण्यास इच्छुक कामगारांना मदत करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक – 14434 देखील दिलेला आहे. नंबर वर कॉल करून कामगार माहिती आणि प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊ शकतात. पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती राज्य सरकारांच्या विभागांनाही देण्यात येत आहे. (What are the benefits of e-shramika card to the workers? Know about the plan)

संबंधित बातम्या :

अवकाशातून पडला दगड, मग पंचनामा अन् बारा भानगडी

बळीराजाची फसवणूक, खतांमध्ये भेसळ झाल्याचा संशय, कृषी केंद्राचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात

मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, चिखलात असलेली पिके आता पाण्यातच

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI