मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, चिखलात असलेली पिके आता पाण्यातच

पावसाचा (Heavy Rain) जोर कमी म्हणून की, काय आता नदी पात्रातील पाणीही शेतामध्ये साठत आहे. मांजरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून आता या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याचा फटका (Manjra River) मांजरा नदी लगतच्या शेतांना बसत आहे. आगोदरच पावसामुळे खरीपातील सोयाबीन हे चिखलात आहे आता नदीचे पाणीच या पिकामध्ये साठत असल्याने काढणीची कामे करावित तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, चिखलात असलेली पिके आता पाण्यातच
मांजरा नदीपात्रातील पाणी शेतामध्ये गेल्याने पिकाचे नुकसान
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 1:56 PM

लातूर : पावसाचा (Heavy Rain) जोर कमी म्हणून की, काय आता नदी पात्रातील पाणीही शेतामध्ये साठत आहे. मांजरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून आता या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याचा फटका (Manjra River) मांजरा नदी लगतच्या शेतांना बसत आहे. आगोदरच पावसामुळे खरीपातील सोयाबीन हे चिखलात आहे आता नदीचे पाणीच या पिकामध्ये साठत असल्याने काढणीची कामे करावित तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे मांजरा धरण हे 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणातून 149.80 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शिवाय नदीलगतच्या गावांना सतर्कतेची इशारा देण्यात आला आहे. पाण्याच्या विससर्गामुळे शिरुरअंतपाळ तालुक्यातील फकरानपूर, वांजरखेडा, हालकी, डोंगरगाव, उजेड बिबराळ, बाकली यांसह राणी अंकुलगा शिवारात पाणी साठल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे.

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच धरण क्षेत्रात पावसाचा जोर हा कायम आहे. त्यामुळे धोका हा टळलेला नाही. पावसाचा फटका आगोदरच पिकांना बसलेला आहे. आता शेतामध्येच पाणी साठत असल्याने शेती कामे करावित कशी प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे नुकसानीचे कोणतेही निकष लावण्यात वेळ खर्ची न करता थेट आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी हे करीत आहेत.

आतापर्यंत हे धरण 14 वेळा हे धरण भरले आहे. यापुर्वी 2017 साली हे धरण भरले होते. यंदा मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आठही प्रमुख धरणे ही भरलेल्या अवस्थेत आहेत. मंगळवारी मांजरा धरण हे ओव्हरफ्लो झाले असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा हा सुरु असून पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सहा दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 149.80 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मांजरा धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे. सध्या धरणातून 149.80 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शिवाय आजही पावसाचा अंदाड हा व्यक्त करण्यात आला असल्याने लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, टाकळगाव, सारसा, वांजरखेडा, बोडका, पोहरेगाव, नागझरी, जेवळी, टाकळी या मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गतवर्षीही परतीच्या पावसाने झाले होते नुकसान

गतवर्षीही परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिरुरअंतपाळ, निलंगा तालुक्यातील शेतजमिनी खरडून गेल्या होत्या तर पिके ही वाहून गेली होती. यंदाही खरीपातील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. शिवाय आता शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने भविष्यातील रब्बीची पेरणीबाबतही साशंका उपस्थित होऊ लागली आहे. (Water from Manjra river directly into farm, crop damage)

संबंधित बातम्या :

व्यथा शेतकऱ्याची : दोन एकरामध्ये दीड लाखाचा खर्च अन् पपईला दर 4 रुपये किलो

ज्याची भीती होती तेच झाले, उभ्या सोयाबीनलाच कोंब फुटले

आघाडी सरकारची शिफारस शेतकऱ्यांसाठी घातक : डॉ. अनिल बोंडे ; एफ.आर.पी. रकमेवरून राजकारण

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.