व्यथा शेतकऱ्याची : दोन एकरामध्ये दीड लाखाचा खर्च अन् पपईला दर 4 रुपये किलो

शिरुरअंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील शेतकऱ्याने दोन एकरामध्ये पपईचे उत्पादन घेतले होते. नैसर्गिक समस्यांना तोंड देत त्यांनी मोठ्या कष्टाने दिड हजार झाडे जोपासली पण आता पपईला कवडीमोल दर मिळत असल्याने तोडणीला आलेली (papaya) पपई आता वावरातच गळून पडत आहे. त्यामुळे पारंपारिक मिळणारे पीकही गेले आणि या झाडांसाठीच खर्चही वाया गेल्याची शेतकऱ्याची भावना झाली आहे.

व्यथा शेतकऱ्याची : दोन एकरामध्ये दीड लाखाचा खर्च अन् पपईला दर 4 रुपये किलो
संग्रहीत छायाचित्र

लातूर : पारंपारिक पिकातून भरघोस उत्पादन मिळत नाही म्हणून आता मराठवाड्यातील शेतकरीही आधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. पण कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारात मिळत नसलेला दर यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. (Farmer) शिरुरअंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील शेतकऱ्याने दोन एकरामध्ये पपईचे उत्पादन घेतले होते. नैसर्गिक समस्यांना तोंड देत त्यांनी मोठ्या कष्टाने दिड हजार झाडे जोपासली पण आता पपईला कवडीमोल दर मिळत असल्याने तोडणीला आलेली (papaya) पपई आता वावरातच गळून पडत आहे. त्यामुळे पारंपारिक मिळणारे पीकही गेले आणि या झाडांसाठीच खर्चही वाया गेल्याची शेतकऱ्याची भावना झाली आहे.

सोयाबीन, उडीद पिकाने उत्पन्न मिळत नसल्याने येरोळ येथील पाशा गफुरसाब कोतवाल यांनी ऑक्टोंबर महिन्यात दोन एकरामध्ये दिड हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती. लागवडीपासूनच खताची फवारणी, मर्यादीत पाणी याचे त्यांनी नियोजन केले. य़ाशिवाय मध्यंतरीच्या ढगाळ वातावरणामुळे या झाडांवर किडीचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी हजारो रुपये खर्च करुन झाडांची जोपासना केली होती.

परीश्रम आणि योग्य नियोजन यामुळे या पिकातून चार पैसे पदरी पडतील अशी आशा कोतवाल यांना होती. पण ऐन फळ तोडणीच्या प्रसंगी पपईचे दर पडले आहेत. व्यापाऱ्यांनी तर 4 रुपये किलोप्रमाणे मागणी केली आहे. शिवाय आता पाऊस झाल्यानंतर व्यापारीही फिरकाना झाले आहेत. दोन एकरावरील पपई जोपासण्यासाठी कोतवाल यांना दोन लाखाचा खर्च आला आहे.

आता फळ काढणीला आले असताना मागणी नसल्याने पपई गळून वावरातच पडत आहे. दरवर्षी पारंपारिक पिकातून उत्पादनावरील खर्च तरी निघत होता. पण या प्रयोगामुळे कोतवाल यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

नविन प्रयोग शेकऱ्यांच्या अंगलट

अधिकचे परीश्रम करुनही पारंपारिक पिकातून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी फळबाग लागवडीचे प्रयोग करीत आहे. मात्र, त्याली ना निसर्गाची साथ आहे ना बाजार भावाची. पपईला मागणी होत नसल्याने कोतवाल यांनी व्यापाऱ्याकडे खेटे मारले आहेत. सुरवातीला केवळ 4 रुपये किलोप्रमाणे मागणी करण्यात आली. मात्र, भविष्यात वाढीव दर मिळतील या आशेने त्यांनी झाडांची जोपातना केली पण आता पाऊस झाल्यानंतर व्यापारी फिरकलेही नाहीत. त्यामुळे कोतवाल यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.

मजुराचा खर्चही निघेणा

पपईला फळ जोमात आहे. परंतू, मागणीच नसल्याने काढणी रखडली आहे. शिवाय काढणीसाठी आता मजूराचा खर्चही परवडत नसल्याने ही झाडे वावरातच आहेत. आता रब्बीसाठी शेत रिकामे करायचे आहे. वेळेत योग्य मागणी झाली नाही तर उभी बाग वावराबाहेर काढल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. (loss-of-farmer-due-to-lack-of-proper-rate-for-papaya-farmers-agony)

संबंधित बातम्या :

उडीदाबरोबर सोयाबीनचेही दर स्थिर, लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली

महाराष्ट्र – बिहार दरम्यान किसान रेल्वेची सेवा ; शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान

सामूहिक सातबाऱ्यावरील प्लॅाट विक्रीला बंदी ; मग काय पर्याय आहे, जाणून घ्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI