AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनचे दर वाढूनही शेतकऱ्यांची चिंता कायम, काय आहे कारण?

नैसर्गिक संकटाचा सामना करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नविनच समस्या उभी ठाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्य दरात वाढ होत आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर चोरट्यांनाच होताना दिसत आहे. कारण गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात तीन ठिकाणी सोयाबीन चोरीच्या घटना घडल्या आहेत.

सोयाबीनचे दर वाढूनही शेतकऱ्यांची चिंता कायम, काय आहे कारण?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 11:35 AM
Share

अमरावती : नैसर्गिक संकटाचा सामना करताना दमछाक झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नविनच समस्या उभी ठाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून (soybean prices increased) सोयाबीनच्य दरात वाढ होत आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर चोरट्यांनाच होताना दिसत आहे. कारण गेल्या चार दिवसांमध्ये राज्यात तीन ठिकाणी सोयाबीन (Soybean theft) चोरीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी धुळे येथे कांदा चोरी झाली होती. आता सोयाबीनचे दर वाढताच चोरट्यांनी आपला मोर्चा या पिकाकडे वळविला आहे.

खरिपातील सोयाबीन पिकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. असे असतानाही काढणी, मळणी करुन अपेक्षित दरासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. मात्र, सोयाबीन विक्रीचा विचार सुरु असतानाच शेतकऱ्याच्या स्वप्नावर चोरट्यांनी पाणी फिरवले आहे. सोयाबीन चोरीच्या दोन घटना ह्या अमरावती जिल्ह्यात तर एक घटना ही बीड जिल्ह्यात घडली आहे.

घरासमोर ठेवलेले सोयाबीन लंपास

अमरावती जिल्ह्यातील सुपलवाडा येथील विलास मारबदे यांनी आपल्या घरासमोर 23 पोते सोयाबीनची साठवणूक केली होती. त्यांना अपेक्षीत दराची प्रतिक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दरात सुधारणा होत असल्याने सोयाबीन विक्रीचा विचार सुरु होता. मात्र, 7 पोत्यातून साडेचार क्विंटल सोयाबीन लंपास करण्यात आले होते. ऐन विक्रीच्या दरम्यानच चोरी झाल्याने त्यांनी केलेली मेहनत आणि सर्वकाही वाया गेले आहे. तब्बल 16 हजार रुपयांचे सोयाबीन चोरीला गेले असल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

उभ्या सोयाबीनवरच चोरट्यांचा डल्ला

अमरावती जिल्ह्यातील घुईखेड परिसरातील सोयाबीनची काढणी ही पावसाने लांबली आहे. आता कुठे उघडीप दिल्याने कापणी कामे सुरु होणार होती. पण सोयाबीन कापणीचे काम शेतकऱ्यांच्या आगोदर चोरट्यांनीच केले आहे. आशुतोष गुल्हाने यांच्या शेतातील उभे सोयाबीन चोरट्यांनी काढून लंपास केले आहे. यामध्ये 50 हजाराचे नुकसान झाल्याचे गुल्हाने यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

हातातोंडाशी आलेला घास चोरट्यांनी हिसकावला

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन पिकावर नैसर्गिक संकट होते. काढणीच्या दरम्यान अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे नुकसान तर झालेच होते. पण आता उरलेसुरल्या सोयाबीनमधून चार पैसे पदरात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतू, दर वाढत असतानाच चोरट्यांनी सोयाबीनवर डल्ला मारला आहे. दरवर्षी अशा घटना घडतात. पण यावेळी चोरट्यांनीही दराचा अभ्यास करुनच चोरी केली आहे.

बीडमध्ये व्यापाऱ्याची फसवणूक

तालुक्यातील चौसाळा येथील व्यापाऱ्याने विक्रीसाठी पाठवलेले 15 लाख किमतीच्या सोयाबीन घेऊन ट्रक चालकाने पोबारा केला होता. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौसाळा येथील व्यापारी अंगद नाईकवाडे यांनी 15 लाख किमतीचे सोयाबीन अर्जुन आसाराम कुडके यांच्या ट्रान्स्पोर्टच्यामार्फत धुळे येथे पाठविले होते. मात्र, ट्रक चालक शेख अख्तर शेख याने सोयाबीन धुळे येथे पोहचते केलेच नाही. धारुरच्या एका व्यापाऱ्याच्या मध्यस्तीने हे सोयाबीन परळी तालुक्यातील धर्मापूरी येथेच उतरुन घेतले होते. त्यामुळे आता कुठे सोयाबीनला दर मिळत असताना चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांच्या मजबुती करणासाठी केंद्र सरकारची कृषी पायाभूत सुविधा योजना, नेमकी आहे तरी काय?

कांद्याची लागवड की पेरणी, शेतकऱ्यांसाठी काय आहे सोयीस्कर..?

पावसामुळे पीक पध्दतीमध्येच झाला बदल, भूजल पातळी वाढली अन्…!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.