AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar : वातावरण बदलामुळे पपई काढणीला वेग, शेतकरी प्रतिनिधी व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

पपईला 16 रुपये प्रति किलो दर देण्यात आला असून पुढील बैठकीपर्यंत हा दर कायम राहील अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Nandurbar : वातावरण बदलामुळे पपई काढणीला वेग, शेतकरी प्रतिनिधी व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय
Papaya PlantImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 24, 2023 | 11:58 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक बेल्ट म्हणून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याची ओळख आहे. त्याचबरोबर शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतून (Agricultural Produce Market Committee) पपईचे दर (Papaya rate) ठरत असतात. शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईचे दर निश्चित करण्यात आले. पपईला 16 रुपये प्रति किलो दर देण्यात आला असून पुढील बैठकीपर्यंत हा दर कायम राहील अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात तापमान 32°c च्या वरती गेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पपईच्या काढणीला वेग दिला आहे. वेगवान काढणी होत असल्याने पपईची आवक वाढली असून वाढत्या आवकमुळे आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मागणी कमी झाल्याने व्यापारी आणि शेतकरी यांच्या झालेल्या बैठकीत दरात एक रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पपईच्या काढणीला वेग दिला आहे. त्याचा परिणाम म्हणजे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पपईची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम पपई दरांवर झाला असून पपईच्या दरप्रति किलो 1.25 पैशांनी कमी झाले आहेत. व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरातच्या सीमावरती भागातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जात असते यावर्षी पपईला चांगले तर मिळत असल्याने पुढच्या वर्षी पपईच्या क्षेत्रांमध्ये अजून वाढ होईल असा अंदाज पपई केळी उत्पादक संघाचे अभिजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पपईचे दर ठरवताना शेतकरी आणि व्यापारी यांच्या समन्वयातून ठरत असल्याने शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत नसल्याचे चित्र आहे. शहादा बाजार समिती शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्या दर पंधरवड्याला होणाऱ्या बैठकीत बाजाराच्या स्थितीचा विचार करून पपईचे दर कमी जास्त केले जात असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यातील वाद मिटला आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.