ईडीकडून जरंडेश्वर कारखाना सील, 22 हजार हेक्टरवरील ऊसाचं काय करायचं? शेतकऱ्यांचा मोर्चा

जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. ईडी कारवाईच्या विरोधात संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

ईडीकडून जरंडेश्वर कारखाना सील, 22 हजार हेक्टरवरील ऊसाचं काय करायचं? शेतकऱ्यांचा मोर्चा
साखर कारखाना

सातारा: जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या ईडी कारवाईच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. ईडी कारवाईच्या विरोधात संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ईडीनं 1 जुलै रोजी जरंडेश्वर कारखाना म्हणजेच जरंडेश्वर शुगर मिलला सील केलं होतं. जरंडेश्वरवरील कारवाईची राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना सुरु करावी अशी भूमिका घेतली आहे. (Sugarcane Farmers march at Koregaon Magistrate office to restart Jarandeshwar Sugar Mill which sealed by ED)

22 हजार हेक्टरवरील ऊसाची नोंद

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केली. ईडीच्या जिल्ह्यातील कोरेगाव, वाई, खंडाळा आणि खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी सुमारे 22 हजार हेक्टर क्षेत्रात उसाची नोंद या कारखान्यामध्ये झाली असून येवढ्या उसाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ईडी कारवाईमुळं संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोरेगाव येथे तहसीलदार कार्यालय मोर्चा काढला. या मोर्चात वाई, कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकरी शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. जरंडेश्वर शुगर कारखान्यावर ईडीने केलेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत हा सर्व प्रकार राजकीय सूडबुद्धीने केला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने याची दखल घेऊन जरंडेश्वर कारखाना पूर्ववत सुरू ठेवावा या मागणीचे निवेदन कोरेगाव तहसीलदारांना देण्यात आले.

ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी

ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी चालवली आहे. त्यामुळे जरंडेश्वर कारखान्यावर टाच आणली आहे. मात्र, सध्या जरंडेश्वर शुगर मिल कंपनी कारखाना चालवते. सीआयडी, एसीबीनं चौकशी केली त्यामध्ये काहीही समोर आलं नाही. ईओडब्ल्यूकडून चौकशी सुरु आहे. ती चौकशी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात आरोप करण्यात आले होते पण त्यासंदर्भात पॉझिटिव्ह निकाल आले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

इतर बातम्या:

Jarandeshwar Sugar Mill | जरंडेश्वर साखर कारखाना सील, अजित पवार ईडीच्या रडारवर? नेमकं प्रकरण काय?

मामाच्या साखर कारखान्यावर ED ची कारवाई; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

(Sugarcane Farmers march at Koregaon Magistrate office to restart Jarandeshwar Sugar Mill which sealed by ED)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI