ऊस उत्पादकांचा प्रश्न निकाली, 6 ऊसतोड टोळ्या नव्याने दाखल, कन्नड कारखान्यात कसे झाले परिवर्तन?

ऊस उत्पादकांचा प्रश्न निकाली, 6 ऊसतोड टोळ्या नव्याने दाखल, कन्नड कारखान्यात कसे झाले परिवर्तन?
साखर कारखाना

जिल्ह्यातील कन्नड साखर कारखान्याकडून तर तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडून इतर तालुक्यातील ऊसाचे गाळप करण्याचा धडाका सुरु करण्यात आला होता. मात्र, बाहेर तालुक्यातील ऊसाचे गाळप करण्यास प्राधान्य दिले तर ऊसाचे एक टिपरुरही विकू देणार नसल्याची भूमिका शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी घेतली होती.

दत्ता कानवटे

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 26, 2022 | 2:35 PM

औरंगाबाद : यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. त्यामुळे एक वर्ष उलटूनही ऊस फडातच असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गाळप हंगाम मध्यावर असतानाही (Sugar Factory) साखर कारखान्यांकडून गांभीर्याने घेतले जात नाही. जिल्ह्यातील कन्नड साखर कारखान्याकडून तर तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडून इतर तालुक्यातील ऊसाचे गाळप करण्याचा धडाका सुरु करण्यात आला होता. मात्र, बाहेर तालुक्यातील (Cane crushing) ऊसाचे गाळप करण्यास प्राधान्य दिले तर ऊसाचे एक टिपरुरही विकू देणार नसल्याची भूमिका शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी घेतली होती. या भूमिकेमुळेच आता कारखाना क्षेत्रातील ऊसाचे गाळप अधिक गतीने व्हावे म्हणून 6 ऊसतोड टोळ्या तालुक्यात पाठवविण्यात आल्याची माहिती आ. दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक (Farmer) शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे. तालुक्यातील ऊस तोडणीला प्राधान्य न देता इतर तालुक्यातील ऊसाचे गाळप करण्याचा प्रकार सुरु होता. त्यामुळे ही आक्रमक भूमिका घेतली असल्याचे आ. दानवे यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे.

कन्नड साखर कारखान्याचे अध्यक्ष रोहित पवार

औरंगाबाद जिल्ह्यातील बारामती ऍग्रो च्या कन्नड साखर कारखान्याचे अध्यक्ष हे राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार हे आहेत. पण राजकीय हीत जोपासत इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप केले जात होते. त्यामुळे कार्यक्षेत्र असलेल्या भागातील ऊस हा फडातच वाळून जात होता. कारखान्याच्या या धोरणावर संतप्त होत आ. दानवे यांनी बाहेरच्या तालुक्यातील ऊसाचेच गाळप केले जात असेल तर या कारखान्यावर ऊसच येऊ दिला जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. आक्रमक पवित्र्याचीच दखल घेत कारखान्याने ऊस तोडणीची व्यवस्था केल्याचे आ. दानवे यांनी सांगितले आहे.

6 ऊसतोड टोळ्या कार्यक्षेत्रात दाखल

गाळप हंगाम सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी झालेला आहे. असे असताना अजूनही ऊसतोड बाकीच आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने अधिकचे कामगार तालुक्यासाठू उपलब्ध करावेत अन्यथा तालुक्यातील ऊसतोडणी अगोदर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर कन्नड तालुक्यातील ऊस तोडणीसाठी 6 ऊसतोड टोळ्या नेमून दिल्या आहेत. त्यामुळे ऊसतोडीचे काम अधिक गतीने होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत कन्नड तालुक्यातील ऊसाचे गाळप होत नाही तोपर्यंत इतर तालुक्यातील ऊस कारखान्यावर आणू दिला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

ऊसतोड लांबल्यावर काय होते?

लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच.

संबंधित बातम्या :

Drip Irrigation : ठिबकसाठी वाढीव अनुदानाची घोषणा मात्र, बांधावरची स्थिती चक्रावून टाकणारी

द्राक्षातून नाहीतर बेदाण्यातून उत्पादनवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा, व्यापारी प्रतिक्षेत

KCC कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी : योजना एक अन् फायदे अनेक, वेळेत परतावा केल्यास व्याजदरही घटणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें