AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : प्रतीक्षा संपली, उर्वरित 25 टक्केही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर

खरीप हंगामात अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ऐन काढणीच्या दरम्यानच पावसाची अवकृपा झाली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला होता. त्यानुसार पंचनामे आणि पीक पाहणी करुन सरकारने मदतीची घोषणा केली होती. पैकी 75 टक्के रक्कम ही दीपावली दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. तर आता उर्वरीत 25 टक्के नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे.

Latur : प्रतीक्षा संपली, उर्वरित 25 टक्केही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर
पीकविमा योजनेच्या बदलत्या स्वरुपानंतर शेतकऱ्यांना मिळणार का न्यायImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 11:18 AM
Share

लातूर : खरीप हंगामात (Heavy Rain) अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ऐन काढणीच्या दरम्यानच पावसाची अवकृपा झाली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला होता. त्यानुसार पंचनामे आणि पीक पाहणी करुन (Government) सरकारने मदतीची घोषणा केली होती. पैकी 75 टक्के रक्कम ही दीपावली दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. तर आता उर्वरीत 25 टक्के नुकसानीची मदत (Farmer Account) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. उशिरा का होईना पण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तब्बल 77 हजार 775 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 8 कोटी 29 लाख 66 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

मांजरा-तेरणा प्रकल्पामुळे अधिकचे नुकसान

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून मांजरा आणि तेरणा नदीचा प्रवाह होतो. सप्टेंबर महिन्य़ातील अतिवृष्टी दरम्य़ान मांजरा आणि तेरणा नदीचे दरवाजे हे उघडण्यात आले होते. त्यामुळे या नदी पात्रातील पाणी थेट शेतकऱ्यांच्या शिवारात घुसले होते. सोयाबीनसह इतर पिकांचे तर नुकसान झालेच पण शेतजमिनीही खरडूव गेल्याच्या घटना निलंगा तालुक्यात घडल्या होत्या. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार जवळपास 75 हजार हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले होते.त्यानुसार सरकारने दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत कोरडवाहूसाठी हेक्टरी 10 हजार तर बागायतीसाठी 18 हजार व फळबागांसाठी 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती.

उशिरा का होईना मदत शेतकऱ्यांच्या पदरी

पहिल्या टप्प्यात या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 54 कोटी 11 लाख रुपये अदा करण्यात आले होते. मात्र, दीपावली नंतर शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील मदतीची प्रतिक्षा लागली होती. पंधरा दिवसापूर्वीच प्रशासनाकडे ही रक्कम अदा करण्यात आली होती. त्यानंतर तलाठ्यांकडून याद्यांचे संकलन करुन अखेर ही 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. पहिला मान निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला असला तरी उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

नदीकाठच्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान

लातूर जिल्हा हा तसा दुष्काळी भाग आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत असल्याने परस्थिती बदलत आहे. शिवाय जिल्ह्यातून मांजरा आणि तेरणा नद्यांचा प्रवाह होतो. मात्र, सलग दुसऱ्या वर्षाी हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी सोडण्यात आले होते. यामुळे खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असतानाच ही परस्थिती ओढावली आणि यामध्ये सर्वाधिक नुकसान नदी लगतच्या शेतकऱ्यांचे झाले होते.

संबंधित बातम्या :

Kokan : जे आंब्याचे तेच काजू बांगाचे, 30 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी

Cotton Crop : पुन्हा पांढऱ्या सोन्याने बहरणार शिवार, घटलेले क्षेत्र कशामुळे वाढणार?

PM kisan Yojna : शेतकऱ्यांना दिलासा, e-KYC बाबत सरकारचा मोठा निर्णय..!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.