Beed : अतिरिक्त उसाची आता होळीच, गेवराईतील ‘त्या’घटनेनंतर शेतकरीच पेटवतोय ऊसाचे फड

Beed : अतिरिक्त उसाची आता होळीच, गेवराईतील 'त्या'घटनेनंतर शेतकरीच पेटवतोय ऊसाचे फड
ऊस तोड होत नसल्याने बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील शेतकऱ्याने थेट उसाचा फड पेटवून दिला आहे.
Image Credit source: TV9 Marathi

राज्यातील ऊस गाळप हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे. अतिरिक्त उसामुळे ही स्थिती उद्भवली आहे.यामध्येच मराठवाड्यात गाळपाविना अधिकचा ऊस शेतातच उभा आहे. यंदा क्षेत्र वाढल्याने ही परस्थिती ओढावणार याची कल्पना असतानाही प्रशासनाने योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे आज 18 महिन्यानंतरही ऊस फडातच उभा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप झाले असले तरी राज्यात सर्वाधिक शिल्लक ऊस हा मराठवाड्यातच.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: VN

May 13, 2022 | 2:24 PM

बीड: राज्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे. (Sugarcane Sludge) गाळप हंगाम पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असतानाही राज्यात 24 हजार हेक्टरावर ऊस शिल्लक असल्याची कबुली साखर आयुक्त कार्यालयानेच दिली आहे. उसाचे गाळप होईल याबाबतची आशा मावळल्याने शेतकरीच आता उसाचे फड पेटवून देत आहेत. (Beed District) वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील शेतकऱ्याने दीड एकरातील उसाला काडी लावलीय. उसाचे गाळप व्हावे म्हणून अनेक वेळा साखर कारखान्यावर खेटे मारले मात्र, कारखाना प्रशासनाकडून योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने थेट उसाचा फडच पेटवून दिला आहे. गेवराई तालुक्यात अतिरिक्त उसाचे गाळप न झाल्यामुळे शेतकऱ्याने गळफास घेतला होता. त्यानंतर आता उसाचे फडच पेटवून दिले जात असल्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत.

सर्वाधिक शिल्लक ऊस मराठवाड्यात

राज्यातील ऊस गाळप हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे. अतिरिक्त उसामुळे ही स्थिती उद्भवली आहे.यामध्येच मराठवाड्यात गाळपाविना अधिकचा ऊस शेतातच उभा आहे. यंदा क्षेत्र वाढल्याने ही परस्थिती ओढावणार याची कल्पना असतानाही प्रशासनाने योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे आज 18 महिन्यानंतरही ऊस फडातच उभा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप झाले असले तरी राज्यात सर्वाधिक शिल्लक ऊस हा मराठवाड्यातच. वर्षभराची मेहनत आणि पदरी एक रुपयाही उत्पन्न न पडल्यामुळेच ऊस उत्पादक शेतकरी हे टोकाचा निर्णय घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच्या घटनेनंतर असा हा रोष

अतिरिक्त ऊसाला घेऊन दोन दिवसांपूर्वीच गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असतानाही दखल घेतली जात नाही. आतापर्यंत एक ना अनेक पर्याय प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आले आहेत. पण अंमलबजावणी नसल्याने अतिरिक्त ऊस फडातच आहे. त्यामुळे गेवराईच्या शेतकऱ्याची आत्महत्या नव्हे तर व्यवस्थेने घेतलेला तो बळी असल्याचा आरोप होतोय. शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्यानंतर आता थेट उसाचा फडच पेटवून शेतकरी आपला रोष व्यक्त करीत आहे.

हे सुद्धा वाचा

कारखान्यावरील खेटेही व्यस्तच

वडवणी तालुक्यातील चिंचोटी अल्पभुधारक शेतकरी शिवाजी सुंदरराव गोंडे यांनी दीड एकरावर ऊसाची लागण केली. गेल्या वर्षी तेलगाव येथील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला होता. मात्र, या वर्षी अनेक वेळा कारखाण्याला खेटा मारल्या, परंतू यावेळी सध्या टोळी नाही, तुमचा ऊस मालक तोड करून कारखाण्याला आणा, असे त्यांना सांगण्यात आले. मालक तोड करायची म्हणजे ऊस तोडणीदार 1000 ते 1200 रु प्रति टन तोडणीला नगदी द्यावे लागतात. शिवाय ड्रायवर इंट्री 1000 रुपये. या सर्व बाबींना त्रासून गोंडे यांनी अखेर दीड एकरातील ऊस पेटवूनच दिला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें