शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, यंदा कापसाच्या पिकातून अधिक उत्पन्नाची संधी

भारतीय कापसाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय कापसाचे दर जास्त असल्याने चालू हंगामात कापसाची निर्यात 10 लाख गाठ्ठे वाढून 60 लाख गठ्ठे होण्याची अपेक्षा आहे. (The good news for farmers is the opportunity to earn more from the cotton crop this year)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:00 AM, 17 Apr 2021
शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, यंदा कापसाच्या पिकातून अधिक उत्पन्नाची संधी
यंदा कापसाच्या पिकातून अधिक उत्पन्नाची संधी

नवी दिल्ली : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) गुरुवारी अंदाज व्यक्त केला आहे की ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या 2020-21 कापूस हंगामाची निर्यात 20 टक्क्यांनी वाढून 60 दशलक्ष गठ्ठे होण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च दर हे त्याचे मुख्य कारण आहे. सीएआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2019-20 हंगामात कापसाची निर्यात 50 लाख गठ्ठे होती. सीएआयचे अध्यक्ष अतुल गणत्रा म्हणाले, भारतीय कापसाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय कापसाचे दर जास्त असल्याने चालू हंगामात कापसाची निर्यात 10 लाख गाठ्ठे वाढून 60 लाख गठ्ठे होण्याची अपेक्षा आहे. एका महिन्यापूर्वी, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कापसामधील सरासरी किंमतींमधील फरक 10 ते 13 सेंट दरम्यान होता जो आता 4 ते 5 सेंटच्या आसपास आहे. (The good news for farmers is the opportunity to earn more from the cotton crop this year)

देशभरात सात मेगा टेक्सटाईल हब उभारण्याची योजना

नॅशनल टेक्सटाईल पॉलिसी(National Textile Policy)मध्ये 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 100 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले जाण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भारताला जागतिक वस्त्रोद्योग खेळाडू बनविण्यासाठी या क्षेत्रातील अनेक घटकांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा विचार आहे. भारत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी सुमारे 75% मशिनरी आयात करतो. आता या परिस्थितीत बदल घडवून स्वदेशी यंत्रसामग्री तयार करण्याचा हेतू आहे. धोरणानुसार, देशभरात सात मेगा टेक्सटाईल हब उभारण्याची योजना आहे. तयार झालेल्या उत्पादनांच्या निर्यातीपासून कच्च्या मालापर्यंत एकूण एख सर्व उत्पादने या केंद्रांवर उपलब्ध असतील.

चांगल्या निर्यातीची अपेक्षा

– कापड उद्योग सुरळीत चालविण्यासाठी पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने 30 जूनपर्यंत सूती धाग्याच्या आयातीवरील सीमाशुल्क हटविण्यास मान्यता दिली आहे.

– अर्थ मंत्रालयाने माहिती दिली की, पाकिस्तानचे वस्त्र निर्यात क्षेत्र सतत ड्युटी फ्री कापसाची मागणी करीत आहे आणि ड्युटी फ्री कापूस पाकिस्तानला भारतातूनच स्वस्त मिळू शकेल.

– दुसर्‍या देशातून ती विकत घेतल्यावर पाकिस्तानमध्ये आणण्याचा खर्च इतका वाढतो की तो तोट्यातील करार सिद्ध होतो. म्हणूनच, या कुरघोडीनंतर पाकिस्तानचा कापड उद्योग सतत भारत सरकारकडून कापूस आयात करण्यासाठी दबाव आणत आहे.

– किसी और देश से इसे खरीदने पर उसे पाकिस्तान तक लाने की लागत ही इतनी बढ़ जाती है, कि वो घाटे का सौदा साबित होने लगता है. लिहाजा, पाकिस्तान का कपड़ा उद्योग इस यूटर्न के बाद सरकार पर लगातार भारत से कपास आयात का दबाव बना रहा है.

सेंद्रिय कापसाची किंमत अधिक

– सामान्यत: सेंद्रिय कापसासारखी समान गुणवत्ता अससेल्या बीटी कॉटनच्या तुलनेत सेंद्रिय कापूस 1000 रुपये प्रति गठ्ठा (356 किलो) विकला जातो. परंतु, सध्या महाराष्ट्र आणि गुजरातच्या मंडईंमध्ये कंपन्या 2500 रुपये अधिक दर प्रति गठ्ठ्यासाठी देत आहेत.

– आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या भारतीय कापसाला चांगलाच भाव मिळत आहे, ज्यामध्ये भारतीय कापूस 40 हजार रुपये प्रति गठ्ठा विकला जात आहे, तर जगातील अन्य प्रमुख कापूस उत्पादकांकडून प्रति गठ्ठा 41 हजार रुपये दराने विकला जात आहे.

– भारताची वस्त्रोद्योग व वस्त्रे निर्यात 2024-25 पर्यंत 300 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे, परिणामी देशातील बाजारातील वाटा जागतिक स्तरावर 5% वरून तीन पट वाढ करीत 15% पर्यंत जाईल. (The good news for farmers is the opportunity to earn more from the cotton crop this year)

इतर बातम्या

उस्मानाबादमध्ये कोरोना मृत्यूची लपवाछपवी, मृत्यूनंतर रुग्ण निगेटिव्ह, आक्षेपानंतर पुन्हा पॉझिटिव्ह

Maharashtra Health Department Recruitment 2021 : तंत्रज्ञ ते आरोग्य सेवक, तातडीने भरली जाणारी 10 हजार पदं नेमकी कोणती?